Sachin ahir joins shinde shivsena : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तगडा झटका बसलाय. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला असून महायुतीच्या वतीने त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नुकतेच सहा खासदार फुटलेले असताना आता विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही साथ सोडल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय.
ADVERTISEMENT
शिंदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया
याबाबत बोलताना संजय शिरसाठ म्हणाले, सचिन अहिर हा शिवसेनेचा आमदार होता. शिवसेनेमध्येच आलेला आहे. आजची जी घटना आहे. त्यातून आम्ही शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या मतदारसंघात इतरांनी केलेलं अतिक्रमण आणि त्याच्यावर झालेला अन्याय हा दूर करण्याता प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. तो मूळ शिवसैनिक आहे. त्याला अपात्र करण्याचा प्रश्न येत नाही. तांत्रिक गोष्टींसाठी आम्ही कायदेशीर सल्ला घेतलेला आहे. ठाकरे आता सचिन अहिरांनाही गद्दार म्हणतील.
हेही वाचा : केतन-सियाने प्रवास केला 'त्या' कारच्या ड्रायव्हरचा थरारक खुलासा
उपसभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
सचिन अहिर यांनी शिंदेसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज भरत आपल्या नव्या राजकीय वाटचालीची अधिकृत घोषणा केली. महायुतीचे उमेदवार म्हणून ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : व्यावसायिकाची पत्नी गोगी गँगला मिळाली, पतीच्या हत्येचा कट अन् मागितली 50 लाखांची खंडणी
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता शिवसेनेत प्रवेश
सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले होते.
मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच महायुतीच्या उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
ADVERTISEMENT











