शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी सैन्याच मोठं 'गुपित' केलं उघड, भारताचा हल्ला करण्याचा मार्ग झाला सोप्पा!

Shahid Afridi : बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेचा उल्लेख करताना आफ्रिदीने हे वक्तव्य केलंय. आफ्रिदी म्हणाला, परिस्थिती खूप गंभीर आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Apr 2025 (अपडेटेड: 30 Apr 2025, 03:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी सैन्याबद्दल काय सांगितलं?

point

पाकिस्तानी सैन्य घरातच हारतंय?

point

बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वामध्ये काय परिस्थिती?

Shahid Afridi : पहलगामध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवर एक मोठं विधान समोर आलं आहे. हे विधान कोणत्याही राजकारणी किंवा सुरक्षा विश्लेषकाचं नाही, तर हे विधान आहे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचं. शाहिद आफ्रिदीने स्पष्टपणे म्हटलं आहे की, पाकिस्तानी सैन्य आधीच युद्धासारख्या परिस्थितीत आहे. कारण पाकिस्तानी सैन्य सध्या देशातच अनेक गोष्टींना तोंड देतंय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये आढळला शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह, सोलापूर पुन्हा हादरलं, घटना काय?

बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेचा उल्लेख करताना आफ्रिदीने हे वक्तव्य केलंय. आफ्रिदी म्हणाला, परिस्थिती खूप गंभीर आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सारख्या दहशतवादी संघटनांच्या सततच्या हल्ल्यांमुळे सैन्याचं आधीच मोठं नुकसान होतंय. 

पाकिस्तानी सैन्याचं वास्तव

शाहिद आफ्रिदीच्या या विधानावरून पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती काय आहे हे स्पष्ट होतंय. पाकिस्तानी सैन्य सध्या अंतर्गत बंडखोरी, फुटीरतावादी चळवळ आणि दहशतवादी हल्ल्यांना तोंड देतंय. या परिस्थितीत, ते बाहेरच्या संकटांना (भारताशी संभाव्य युद्ध) तोंड देण्याच्या स्थितीमध्ये नाही. 

बलुचिस्तान आणि तालिबान गटांची दहशत

अलीकडेच, पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) चा कहर केलाय. कारण BLA काही दिवसांपूर्वीच जाफर एक्सप्रेस नावाची ट्रेन हायजॅक केली होती. यादरम्यान, BLA आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत डझनभर पाकिस्तानी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले.

हे ही वाचा >> विम्याचे 53 लाख हडपण्यासाठी भाऊजीनेच मेहुण्याला संपवलं, सिनेमासारखाच रचला डाव, दुचाकी अपघातानंतर...

अनेक पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA), बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF) आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले करत आहेत. दर महिन्याला लष्कराला आपल्या सैनिकांचे प्राण गमवावे लागताय. त्यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये सुरक्षा दलांवर हल्ले सामान्य झाले आहेत.

खैबर पख्तुनख्वामध्येही अशांतता

TTP ही एक दहशतवादी संघटना आहे जी पाकिस्तान सरकार आणि सैन्याविरुद्ध दंड थोपटून उभी आहे. ही संघटना खैबर पख्तुनख्वाच्या आदिवासी भागात सक्रिय आहे. अनेकदा या संघटनेनं सुरक्षा दलांवर हल्ले केले आहेत. खैबर पख्तुनख्वाची सीमा अफगाणिस्तानला लागून आहे. अफगाणमध्ये तालिबान सत्तेत परतल्यानंतर, TTP ला मिळालेल्या पाठिंब्यामुळे ते पाकिस्तानी सैन्यासाठी अधिक धोकादायक बनले आहे. त्यामुळे पाकिस्तान सैन्यासमोर मोठं आव्हान आहे.

    follow whatsapp