रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये आढळला शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह, सोलापूर पुन्हा हादरलं, घटना काय?

मुंबई तक

Solapur Crime News: डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानेही चर्चा झाली होती. ही घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये आणखी एका डॉक्टरच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूरमध्ये पुन्हा एका डॉक्टरची आत्महत्या?

point

बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह

Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेनं सगळेच हादरले होते. प्रसिद्ध डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात होती. त्यातच आता पुन्हा एका शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केली आहे. डॉ. वैशम्पायन शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या एका शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आदित्य नांबियार असल्याचं समजतंय. धक्कादायक म्हणजे, डॉक्टरचा मृतदेह मोठ्या प्रमाणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होता. 

हे ही वाचा >> अजित पवार निधी वाटणार, पण 'या' मंत्र्यांची सुद्धा नजर असणार, फडणवीसांची रणनीती काय?

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानेही चर्चा झाली होती. ही घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये आणखी एका डॉक्टरच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आदित्य नांबियार या डॉक्टर तरूणाने आत्महत्या केली आहे. या घटनेच्या मागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

समोर आलेल्या माहितीनुसार, वसतिगृहाच्या बाथरूममध्येच आदित्यने स्वत:ला संपवलं आहे. जिथे आदित्यचा मृतदेह पडलेला होता, त्या बाथरूमच्या भिंती, बकेट आणि फरशी रक्ताने माखली होती. आदित्यच्या एका बाजूला चाकूही पडलेला दिसला. या दृष्यामुळे त्याच्यासोबत घातपात झाला असाही संशय व्यक्त केला जातोय.

आदित्य नांबियार याचं पार्थिव शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालात काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं असेल.

हे ही वाचा >> चौथ्यांदा मुलगीच झाली, जिथं प्रसूती झाली त्याच रुग्णालयात आईने स्वत:... धक्कादायक घटना

या घटनेची माहिती समजताच सिव्हिल रुग्णालयात सहकारी डॉक्टरांची मोठी गर्दी जमली. या घटनेमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉक्टरांवरील मानसिक तणाव आणि इतर कारणांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पोलिस आणि रुग्णालय प्रशासन या प्रकरणाचा तपास करत असून, लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन आणि न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (वय 69) यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या राहत्या घरी, मोदी परिसरात, बाथरूममध्ये स्वतःच्या परवानाधारक पिस्तूलाने डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ निर्माण करणारी ठरली.



 

हे वाचलं का?

    follow whatsapp