'सगळ्यांनी शिस्त पाळली पाहिजे..' मातोश्रीवरील बैठकीबाबत अंबादास दानवे काय म्हणाले?

शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष तर पाच खासदार हे ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. यावेळी अनुपस्थित राहिलेल्या खासदारांबाबत अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई तक

14 Jun 2026 (अपडेटेड: 14 Jun 2026, 08:33 PM)

follow google news

Ambadas Danve On Matoshree Meeting : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली खासदारांची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत पक्षाच्या खासदारांनी प्रत्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवून आपली एकजूट अधोरेखित केली आहे.  या बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष तर पाच खासदार हे ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. यावेळी अनुपस्थित राहिलेल्या खासदारांबाबत अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हे वाचलं का?

ते म्हणाले की, 'कुणी साहेबांना कळवलं असेल येऊ शकत नाही, कुणाच्या काही अडचणी असतील, तर त्याला काय बोलणार आपण? परंतु शिस्त सगळ्यांनीच पाळली पाहिजे हे ही तितकंच खरं आहे.' या बैठकीला उपस्थित असलेल्या खासदारांमुळे टायगर ऑपरेशन होणार नसल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या बैठकीला अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील हे चार खासदार मातोश्रीवर प्रत्यक्ष उपस्थित होते, तर चार खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.  परभणीचे खासदार संजय जाधव हे या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, संजय बंडू जाधव यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली,