पंढरपूर : रोहित पवारांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, सरकारला काय इशारा दिला?

रोहित पवारांच्या उपोषणाचा आजचा (14 जून) तिसरा दिवस आहे. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

मुंबई तक

14 Jun 2026 (अपडेटेड: 14 Jun 2026, 01:41 PM)

follow google news

Rohit Pawar Farmer Protest : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं शेतकऱ्यांसाठी पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलन करत रोहित पवार सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. यावरुन भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली होती. यानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत. याला प्रत्युत्तर देताना घोटाळा उघड करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. याशिवाय मागण्या पूर्ण झाल्या नाहीत शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन थेट नामदेव पायरीजवळ सुरु करण्याचा अल्टिमेटमही रोहित पवारांनी फडणवीस सरकारला दिला आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि जाचक अटींविरोधात सुरू असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांच्या रक्तातील साखर कमी झाली असून डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे, परंतु 'शेतकऱ्यांच्या वेदनेसमोर आपला त्रास खूप कमी आहे' असे म्हणत त्यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.