कॉक्रोच जनता पार्टीचे नागपूरमध्ये आंदोलन, विद्यार्थी आक्रमक

कॉक्रोच जनता पार्टीचे नुकतेच जयपूर येथे आंदोलन झाले होते, त्या आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेच्या कानशिलात लगावण्यात आली होती. त्यानंतर नागपूर येथील संविधान चौकात अभिजीत दीपकेसह कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करत आहेत. या आंदोलनातून त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुंबई तक

• 06:06 PM • 16 Jun 2026

follow google news

कॉक्रोच जनता पार्टीचे नुकतेच जयपूर येथे आंदोलन झाले होते, त्या आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेच्या कानशिलात लगावण्यात आली होती. त्यानंतर नागपूर येथील संविधान चौकात अभिजीत दीपकेसह कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करत आहेत. या आंदोलनातून त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात विद्यार्थी तसेच नागरिक एकवटलेत. पेपर लीक आणि परीक्षांच्या व्यवस्थेवर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. आंदोलनातील सहभागी तरुण शिक्षण व्यवस्थेविरूद्ध आवाज उठवत आहेत. 

हे वाचलं का?

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि अन्य गैरप्रकारांवर सरकारने लक्ष द्यावे असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या आंदोलनात पेपर लीक प्रकरण आणि परीक्षांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. आंदोलनात सहभागी तरुण महत्त्वाच्या मुद्यांवर सरकारकडे आपले प्रश्न मांडताना दिसत आहेत. पेपर लीकमुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.  

यापूर्वी दिल्ली आणि जयपूर येथे आंदोलन करण्यात आले होते, आता जयपूरनंतर नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले. अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. शिक्षण व्यवस्थेवर आवाज उठवण्याचा मोठा प्रस्ताव आहे.