Kashmir Premier League : Jay Shah कडून मला धमकी मिळाली, माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्जचा गंभीर आरोप

BCCI चे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा मुलगा जय शहा यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्जने गंभीर आरोप केले आहेत. काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये मी सहभाग घेऊ नये म्हणून बीसीसीआय आपल्यावर दबाव टाकत असल्याचं गिब्जने म्हटलंय. मी काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये सहभागी झालो तर भविष्यात भारतात क्रिकेटशी संबंधित एकाही कार्यक्रमात मला येऊ दिलं जाणार […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:27 AM • 31 Jul 2021

follow google news

BCCI चे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा मुलगा जय शहा यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्जने गंभीर आरोप केले आहेत. काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये मी सहभाग घेऊ नये म्हणून बीसीसीआय आपल्यावर दबाव टाकत असल्याचं गिब्जने म्हटलंय.

हे वाचलं का?

मी काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये सहभागी झालो तर भविष्यात भारतात क्रिकेटशी संबंधित एकाही कार्यक्रमात मला येऊ दिलं जाणार नाही अशी धमकी मिळाल्याचं जय शहा यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा प्रमुख ग्रॅम स्मिथच्या माध्यमातून दिल्याचं गिब्जने सांगितलं. यासंदर्भात गिब्जने ट्विटवरुन आपली प्रतिक्रीया दिली आहे.

हर्षल गिब्जआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रशिद लतिफनेही बीसीसीआयवर अशाच पद्धतीचे आरोप केले होते. ४ ऑगस्टपासून काश्मीर प्रिमीअर लिग स्पर्धेला सुरुवात होणार असून १७ ऑगस्टला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. परंतू या स्पर्धेला बीसीसीआयची मान्यता नाही. पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीरमधील प्रत्येकी ३ अशा सहा संघांसोबत ही लीग खेळवली जाते. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात.

    follow whatsapp