न्यूझीलँडच्या संघाकडून भारताचा सात गडी राखून पराभव; टॉम आणि केनने भारतीय गोलंदाजांना धुतले

मुंबई तक

• 10:31 AM • 25 Nov 2022

पहिल्या एकदिवसीय सामन्याच न्यूझीलँडच्या संघाने भारताचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताने 307 धावांचं लक्ष्य देऊन सुद्धा किवीच्या संघाने सहज हा सामना आपल्या खिशात टाकला. न्यूझीलँडकडून टॉम लॅथमने 145 धावांची नाबाद इनिंग खेळली. ज्यात त्याने 19 चौकार आणि 5 षटकार लगावले. तर केन विलियम्सने देखील 98 चेंडूत 94 धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलँडच्या संघाची […]

Mumbaitak
follow google news

पहिल्या एकदिवसीय सामन्याच न्यूझीलँडच्या संघाने भारताचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताने 307 धावांचं लक्ष्य देऊन सुद्धा किवीच्या संघाने सहज हा सामना आपल्या खिशात टाकला. न्यूझीलँडकडून टॉम लॅथमने 145 धावांची नाबाद इनिंग खेळली. ज्यात त्याने 19 चौकार आणि 5 षटकार लगावले. तर केन विलियम्सने देखील 98 चेंडूत 94 धावांची नाबाद खेळी केली.

हे वाचलं का?

न्यूझीलँडच्या संघाची सुरुवाती फारसी चांगली झाली नव्हती. मात्र विलियम्सन आणि टॉम लॅथमच्या खेळीने संघाला सहज विजय मिळवून दिला. दोघांनी 221 धावांची पार्टनरशिप करत 17 चेंडू शिल्लक ठेवत मॅच जिंकून दिला. भारताकडून उमरान मलिकला दोन तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाला. लॅथमच्या शानदार खेळीमुळे त्याला मॅन ऑफ दी मॅच देण्यात आला.

भारताकडून धवन, अय्यर, गिलचे अर्धशतक

आजपासून न्यूझीलँड आणि भारताच्यादरम्यान वन-डे मालिका सुरु झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलँडच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि शुभमन गिलने सलामीला येत जोरदार फलंदाजी करत दोघांनी अर्धशतक पुर्ण केले. शिखर धवन 72 तर शुभमन गिल 50 धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने देखील शानदार फलंदाजी करत चार चौकार आणि चार षटकाराच्या जोरावर 80 धावांची खेळी केला.

307 धावांच दिलं होतं लक्ष्य

सुर्यकुमार यादव आणि रूषभ पंत चांगली कामगिरी करु शकले नाही. पंत 15 तर सुर्यकुमार 4 धावांवर बाद झाला. शेवटच्या ओव्हर्समध्ये संजू सॅमसन आणि वाशिंगटन सुंदर फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 300च्या पार नेली. वाशिंगटन सुंदरने अवघ्या 16 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 37 धावा केल्या. न्यूझीलँडकडून लॉकी फॉर्ग्यूसन आणि टीम साऊथीने प्रत्येकी तीन गडी बाद केले तर अॅडम मिल्नेला एक गडी बाद करता आहे.

टॉम आणि केनची द्विशतकीय पार्टनरशिप

भारताने 7 गडी गमावून न्यूझीलँडच्या संघाला 307 धावांचं टार्गेट दिलं. 307 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या न्यूझीलँडच्या संघाची सुरुवात फारसी चांगली झाली नव्हती. 88 धावांवर त्यांचे तीन गडी बाद झाले होता. त्यानंतर मात्र केन विलियम्सन आणि टॉम लॅथमने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत द्विशतकी भागीदारी केली आणि 48 व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला. तीन सामन्याच्या मालिकेत न्यूझीलँडने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

    follow whatsapp