IPL 2021 Final : CSK ची आश्वासक सुरुवात परंतू ‘हा’ योगायोग ठरु शकतो संघासाठी धोकादायक

मुंबई तक

• 02:29 PM • 15 Oct 2021

IPL च्या चौदाव्या हंगामाच्या अंतिम फेरीला दुबईत सुरुवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात दुबईच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिस यांनी चांगली सुरुवात करुन दिली. परंतू आतापर्यंतच्या लढतींमधला आकडेवारीचा एक निकष हा चेन्नईच्या संघाला […]

Mumbaitak
follow google news

IPL च्या चौदाव्या हंगामाच्या अंतिम फेरीला दुबईत सुरुवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात दुबईच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिस यांनी चांगली सुरुवात करुन दिली. परंतू आतापर्यंतच्या लढतींमधला आकडेवारीचा एक निकष हा चेन्नईच्या संघाला महागात पडण्याची शक्यता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या इतिहासातली दोन्ही विजेतेपदं ही धावसंख्येचा पाठलाग करताना जिंकली आहेत. तसेच आयपीएल २०२१ मध्ये कोलकात्याने जिंकलेल्या सहाही मॅच या धावसंख्येचा पाठलाग करतानाच जिंकल्या आहेत. ज्या दुबईच्या मैदानावर हा अंतिम सामना खेळवला जात आहे त्या मैदानावर गेले ८ सामने हे धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

नेमका हाच योगायोग कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने जुळून आला आहे. त्यातच चेन्नईने अंतिम सामन्यात सुरेश रैनाला संघात स्थान दिलेलं नसल्यामुळे सोशल मीडियावर रैनाचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे चेन्नईला आजच्या सामन्यात बाजी मारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

IPL 2021 : KKR अंतिम फेरीत आल्यामुळे CSK च्या चिंता वाढल्या, फायनलचा इतिहास कोलकात्याच्या बाजूने

    follow whatsapp