Tokyo Olympics : ना सोशल मीडिया, ना फोन हातात घेतला…वाचा Neeraj ने कसं केलं स्वतःला तयार?

मुंबई तक

• 02:19 AM • 08 Aug 2021

पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. २३ वर्षीय नीरज चोप्रा भारताला Athletics प्रकारात गोल्ड मेडल जिंकवून देणारा पहिला भारतीय ठरला आहे. २००८ साली बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने भारताला गोल्ड मेडल जिंकवून दिलं होतं, यानंतर तब्बल १३ वर्षांनी नीरज चोप्राच्या मेहनतीमुळे भारताच्या खात्यात आणखी एक गोल्ड […]

Mumbaitak
follow google news

पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. २३ वर्षीय नीरज चोप्रा भारताला Athletics प्रकारात गोल्ड मेडल जिंकवून देणारा पहिला भारतीय ठरला आहे. २००८ साली बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने भारताला गोल्ड मेडल जिंकवून दिलं होतं, यानंतर तब्बल १३ वर्षांनी नीरज चोप्राच्या मेहनतीमुळे भारताच्या खात्यात आणखी एक गोल्ड मेडल आलं.

हे वाचलं का?

परंतू अंतिम फेरीत येऊन गोल्ड मेडल मिळवण्यापर्यंतचा नीरजचा प्रवास सोपा नव्हता. कठोर मेहनत, परिश्रम आणि सराव या जोरावर नीरजने हे यश साध्य केलं. आपलं ध्येय विचलीत होऊ नये म्हणून नीरजने या दिवसांत सोशल मीडियावर येणं टाळलं होतं. अंतिम फेरीनंतर पत्रकारांशी नीरजने संवाद साधला.

Tokyo Olympics मध्ये सुवर्णाध्याय लिहिणाऱ्या Neeraj Chopra चं महाराष्ट्र कनेक्शन माहिती आहे का?

“मी सोशल मीडियावर आलो नाही, कारण मला माझं पूर्ण लक्ष्य हे अंतिम फेरीवर केंद्रीत करायचं होतं. जर सोशल मीडियावर येऊन मी खूप काही बोलत राहिलो असतो तर गोल्ड मेडल जिंकण्याचे विचार सतत मनात येत राहिले असते. मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करायचं होतं आणि त्यासाठी १०० टक्के प्रयत्न करायचे होते. फक्त १५ दिवसांचा प्रश्न होता, आणि यासाठी फोन जवळ न ठेवणं मला चालणार होतं. मी या दिवसांमध्ये फक्त सराव आणि स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं होतं.”

अंतिम फेरीच्या आदल्या दिवशी मी नीट झोपू शकलो नाही. रात्री बारा-साडे बारा वाजल्याच्या दरम्यान मला झोप लागली. पहाटे साडेपाच वाजता मी उठलो. मी नंतर नाश्ता केला आणि परत झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप लागेना…मला आतून मी कधी एकदा फिल्डवर उतरतोय असं झालं होतं, असंही नीरज चोप्रा म्हणाला. जर्मनी, चेक रिपब्लीक, पाकिस्तान यांचं कडवं आव्हान मोडून काढत नीरजने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरजवर सर्व देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरजचा सामना पाहताना लठ गाड़ दिया छोरे ने असं म्हणत त्याचं कौतुक केलंय. हरियाणा सरकारने या कामगिरीसाठी नीरज चोप्राला सहा कोटींचं बक्षीस आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच याचसोबत नीरज चोप्राला सरावासाठी पंचकुला येथे सवलतीच्या दरात जागा देण्याची तयारीही हरियाणा सरकारने दाखवली आहे.

    follow whatsapp