समृद्धी हायवे अपघात: 'टायर तर नवीनच टाकलेले...', 'त्या' बस मालकाने सगळंच सांगितलं! - Mumbai Tak - 26 people died horrific accident samruddhi highway buldhana new tyre bus virendra darne vidarbha travels company owner - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

समृद्धी हायवे अपघात: ‘टायर तर नवीनच टाकलेले…’, ‘त्या’ बस मालकाने सगळंच सांगितलं!

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. याबाबत विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक वीरेंद्र दरणे यांनी याबाबत एक नवी माहिती दिली आहे.
26 people died horrific accident samruddhi highway buldhana new tyre bus virendra darne vidarbha travels company owner

नागपूर: बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एका बसमधील तब्बल 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की, बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. मात्र, या ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरणे यांनी एक वेगळीच माहिती दिली आहे. वीरेंद्र दरणे यांच्या म्हणण्यानुसार, या बसचे टायर हे नुकतेच बदलण्यात आले होते. त्यामुळे हा अपघात नेमका रस्त्यामुळे झाला की, कशामुळे झाला हे शोधावं लागेल. असं त्यांनी म्हटलं आहे. (26 people died horrific accident samruddhi highway buldhana new tyre bus virendra darne vidarbha travels company owner )

पाहा विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक काय म्हणाले..

‘ही जी बस आहे ती नवीनच होती. ती 2020 मध्ये खरेदी केली होती. आमच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे हा. आम्ही जेव्हा गाडी खरेदी केली तेव्हाच लॉकडाऊन सुरू झालं होतं. त्यामुळे वर्षभर गाड्या उभ्याच होत्या. ही बस जवळपास 5 वाजता नागपुरातून निघाली. त्यानंतर कारंजावरुन बसने समृद्धी महामार्ग धरला. या बसचा जो ड्रायव्हर होता. तो जुना ड्रायव्हर आहे. त्याला बराच अनुभव देखील होता. दानिश असं त्याचं नाव आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटल्याने तिची डिव्हायडरला धडक बसली.’

‘या एसी बस असतात.. यामध्ये प्लाय, गाद्या यासारख्या वस्तू असल्याने त्या लवकर पेट घेतात. तसंच गाडीत 300 ते 400 लीटर डिझेल देखील असतं. या गाडीचे टायर सुद्धा नवीन आहेत. नुकतेच टाकले होते. या गाडीचे सर्व कागदपत्रं देखील रितसर आहेत. आता आम्ही तिथे जात असून मृतकांच्या नातेवाईकांना मदत करत आहोत.’

हे ही वाचा >> Buldhana Accident: लाडक्या लेकाला नागपूरला सोडलं अन्.., नवरा-बायको अन् मुलीचा दुर्दैवी मृत्यू

‘मी फोनवरुन त्यांच्या नातेवाईकांशी सतत संपर्क ठेवून आहोत. हा जो अपघात आहे त्याचं कारण आम्ही शोधणार आहोत. नेमका अपघात हा रस्त्यामुळे झाला की, कशामुळे झाला हे आम्हाला शोधावं लागेल.’ असं वीरेंद्र दरणे यावेळी म्हणाले.

परिवहन विभागाच्या (RTO) अहवालात काय?

बुलढाणा बस दुर्घटनेची अनेक कारणे समोर येत असताना आता अमरावती आणि नागपूर परिवहन विभागाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात ड्रायव्हरच्या चुकांमुळे हा अपघात घडल्याचा ठपका ठेवला गेला आहे. अमरावती परिवहन विभागाच्या अहवालात, बुलढाणा बस दुर्घटना ही टायर फुटून झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर हा अपघात ड्रायव्हरला डुलकी लागल्याने आणि नियंत्रण सुटल्याने झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अमरावतीसोबत नागपूर परिवहन विभागाचाही अहवालही समोर आला आहे. या अहवालात देखील चालकाला डुलकी लागल्याचं म्हटलं आहे. त्यांनीही टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा >> Buldhana Accident: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘समृद्धी महामार्गावर ड्रायव्हरच्या चुकांमुळे…’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अमरावती आणि नागपूर परिवहन विभागाच्या अहवालात बुलढाणा बस दुर्घटनाही ड्रायव्हरच्या चुकीमुळे घडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकार आता काय कारवाई करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!