क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी! पगार तर वाचा...

मुंबई तक

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ ( CBIC ) ने हवालदार पदांसाठी क्रीडा उमेदवारांकडून अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे.

ADVERTISEMENT

क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी!
क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

point

CBIC कडून हवालदार पदांसाठी भरती

point

किती मिळेल पगार?

CBIC Recruitment: क्रीडा क्षेत्रात म्हणजेच खेळात उत्तम कामगिरी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ ( CBIC ) कडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. CBIC ने हवालदार पदांसाठी क्रीडा उमेदवारांकडून अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. खेळासोबतच देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 

या भरती अंतर्गत एकूण 15 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार cbic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

कोण करू शकतं अर्ज? 

या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र असायला हवं. याव्यतिरिक्त, उमेदवारांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही खेळात सहभाग असल्याचा पुरावा द्यावा लागेल. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी ही भरती असणार आहे. 

किती मिळेल पगार? 

हवालदार पदांवर निवड झालेल्या उमेदवाराला 18,000 रुपये ते 56,900 रुपये मासिक वेतन देण्यात येईल. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या नियमांनुसार त्यांना अन्य भत्ते सुद्धा देण्यात येतील. 

हे वाचलं का?

    follow whatsapp