Mulund: 'गुजराती माणसाने मराठी म्हणून जागा नाकारली..', महिलेला धक्काबुक्की; अजित पवार प्रचंड संतापले - ajit pawar reaction on rejected for office premises because of being marathi mulund story - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

Mulund: ‘गुजराती माणसाने मराठी म्हणून जागा नाकारली’, महिलेला धक्काबुक्की; अजित पवार प्रचंड संतापले

ठाण्याच्या मुलुंड भागात एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत ही घटना घडली आहे.
Updated At: Sep 28, 2023 11:11 AM
ajit pawar reaction on rejected for office because of being marathi mulund story

Ajit Pawar Reaction mulund marathi Incident : मुलुंड भागात एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे मराठी महिलेला जागाच नाकारली नाही तर तिला धक्काबुक्की करण्यात आली आहे आणि तिच्या पतीला देखील मारहाण झाल्याचा आऱोप महिलेने केला आहे.या प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, मराठी माणसाचा अपमान करण्याचे धाडस पुन्हा होणार नाही, अशी भूमिका अजित दादांनी मांडली आहे. (ajit pawar reaction on rejected for office because of being marathi mulund story)

नेमकं प्रकरण काय?

मुंबईत राहणाऱ्या तृप्ती देवरूखकर या महिला तिच्या नवऱ्यासोबत ऑफिससाठी जागा पाहण्यासाठी मुलुंड परिसरात गेल्या होत्या. तृप्ती या मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत गेल्या होत्या. यावेळी शिवसदन सोसायटीचे सेक्रेटरी प्रविण ठक्कर यांनी त्यांना सोसायटीत महाराष्ट्रीयन अलाऊड नसल्याचे उत्तर दिले होते. या संबंधित सोसाटीची नियमावलीची कॉपी तृप्ती यांनी मागितली असता सेक्रेटरीने त्यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरूवात केली. तृप्तीसोबत त्यांचा नवरा आणि सोसाटीच्या सेक्रेटरीमध्ये यावरून मोठा वाद देखील झाला.

हे ही वाचा: Ajit Pawar: दादा मुख्यमंत्री? मोहित कंबोज यांचे बोचणारे 8 शब्द, Tweet का केलं डिलीट?

या घटनेनंतर तृप्ती देवरूखकर यांनी फेसबूकवर संपूर्ण घटनाक्रम सांगितला. महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणस अलाऊड नाही आहेत. इतकी मुजोरी, इतका माज कुठून आला? महाराष्ट्रात राहून मराठी माणसांनाच सांगतात, तुम्हाला इथे राहण्याची परवानगी नाही आहे. मग काय गुजरातमध्ये राहायचं का, असा संतप्त सवाल तृप्ती देवरूखकर यांनी यावेळी केला. त्याचसोबत सोसायटीचा सेक्रेटरी माझ्या अंगावर आला, माझ्या नवऱ्याला मारहाण केली,त्यांचा चष्मा देखील तोडला असा गंभीर आरोप तृप्ती देवरूखकर यांनी केला आहे.

गणपतीत तुम्हाला रायगडचा देखावा करायचा असतो, मावळेपण मिरवायचे असते. पण हे खूप भयानक आहे. तुमच्या मनसैनिक आणि शिवसैनिक म्हणण्यात अर्थ नाही, अशी टीका त्यांनी राजकीय पक्षांवर केली.

अजित पवार काय म्हणाले?

मुलुंडमधील या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. अजित पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात अशा घटना अजिबात चालणार नाही. अशी मक्तेदारी सहन केली जाणार नाही. आम्ही या घटनेची गंभीर दखल घेऊ आणि मराठी माणसाचा अपमान करण्याचे धाडस होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ असे अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान या घटनेची दखल स्थानिक मनसे नेत्याने घेतली होती. या मनसे नेत्यानी संबंधित सेक्रेटरीला मराठी माणसाची माफी मागायला लावली होती.

हे ही वाचा: Mumbai: जुहूमध्ये पोलिसासोबत राहायची लिव्ह-इनमध्ये, तरुणीचा मृतदेह पाहून अवघी सोसायटी हादरली!

Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात चिकन खा अन् Weight Loss करा! कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी स्वत:साठी फक्त 5 मिनिटे काढा अन् दिवसाची सुरूवात ‘या’ 8 योगा स्टेप्सने करा! झटपट Weight Loss करायचंय? मग ‘हे’ 8 Snacks खाऊनच बघा… ‘गाव की गोरी बनली, शहर की छोरी’; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन अभिनेत्रीचा फुल ऑन फायर हॉट फिगर; कारण फॉलो करते ‘हा’ Diet Plan 162 किलोच्या IT इंजिनिअरने घटवलं 65 किलो वजन; कोणता सीक्रेट डाएट केला फॉलो? Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण?