'ज्या मराठ्यांनी गद्दारी केली, त्यांचं नाव...', दानवेंनी गुलाबराब पाटलांना सांगितला इतिहास - Mumbai Tak - ambadas danve reaction on gulabrao patil statement - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

‘ज्या मराठ्यांनी गद्दारी केली, त्यांचं नाव…’, दानवेंनी गुलाबराब पाटलांना सांगितला इतिहास

Ambadas Danve News: ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना सातत्यानं गद्दार म्हणून हिणवलं जात आहे. ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं. ‘मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केली’, असं गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्या याच विधानावर बोट ठेवत ठाकरे गटातील नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार […]

Ambadas Danve News: ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना सातत्यानं गद्दार म्हणून हिणवलं जात आहे. ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं. ‘मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केली’, असं गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्या याच विधानावर बोट ठेवत ठाकरे गटातील नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे. (Ambadas Danve Reaction on Gulabrao Patil Statement)

लातूर जिल्ह्यातील वलांडी येथे ठाकरे गटाच्या शिवगर्जना अभियानाची सभा झाली. या सभेत बोलताना अंबादास दानवे यांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोर आमदारांवर टीका केली.

‘मराठा मुख्यमंत्र्यांसाठी गद्दारी’, गुलाबराव पाटलांच्या विधानावर अंबादास दानवे काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “एका नेत्याने वक्तव्य केलं की आम्हाला मराठा मुख्यमंत्री करायचा होता म्हणून आम्ही गद्दारी केली. मराठ्यांचं नाव तुम्ही खराब करू नका. ज्या-ज्या मराठ्यांनी गद्दारी केली, त्यांचं नाव इतिहासात नाहीये.”

कसबा ते गुलाबराव पाटील; महाराष्ट्राच्या राजकारणातील टॉप 5 बातम्या एका क्लिकवर

“ज्या-ज्या मराठ्यांनी निष्ठा ठेवली, त्यांचं नाव इतिहासात आहे, मग ते तानाजी मालुसरे असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, येसाजी कंक असेल, मुरारबाजी असेल… मराठा ही जात नाहीये, तर ती वृत्ती आहे. लक्षात ठेवा”, असा पलटवार अंबादास दानवे यांनी केला.

“महाराष्ट्राच्या भूमीत जो जन्मला तो मराठा आहे. त्यामुळे खंडोजी खोपरे मराठा होऊ शकत नाही, सूर्याजी पिसाळ मराठा होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा गद्दारी करणारे लोक मराठे होऊ शकत नाही, लक्षात ठेवा”, अशी टीका अंबादास दानवे यांनी गुलाबराव पाटलांवर केली.

Eknath Shinde यांचा मोर्चा काँग्रेसकडे? एकमेव खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“‘एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यामध्ये मी गद्दारी केली. फक्त विरोध करायचा.. अरे तुम्ही काय बोंब पाडली ते सांगा.. साध्या खेडेगावात तुम्ही मुतारी देऊ शकले नाही आणि वरून टीका करत असाल तर त्यांचं उत्तर.. जसं आमचे एकनाथ शिंदे साहेब सांगतात…’

‘गुलाबराव पाटील गद्दार झाले.. गद्दार झाले.. अरे गद्दार नाही झाले. एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता. त्याला मुख्यमंत्री करण्यामध्ये मी गद्दारी केली. काय म्हणणं आहे तुझं? माझं चॅलेंज आहे या लोकांना.. हे जे टीका करतात.. शरद पवार, शरद पवार.. एकनाथ शिंदे कोण आहे रे? कोण आहे तो शिंदे?… (मराठा).. मग मी काय मेन्टल आहे का?’, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला होता.

Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीसांची जवळीक वाढतेय?

‘म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की, तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही जातीवाद करत असाल तर गुलाबराव पाटलाने जो त्याग केला तो एकनाथ शिंदेंकरिता केला आहे. चॅलेंजने सांगतो.. तुमचा गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेचा बाजूला बसतो.. यावरच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे’, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर! शाहरुखच्या ‘जवान’ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण… Mumbai : मुंबईतील ‘ही’ 6 भारी ठिकाणं, फॅमिलीसोबत करा एक्सप्लोर!