h3n2 Maharashtra: महाराष्ट्रात पहिला बळी, नागपूरमध्येही संशयिताचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

h3n2 Latest News: अहमदनगरमधील घटनेनं महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा h3n2 विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे नागपूरमध्येही एका h3n2 संशयित ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात h3n2 विषाणूचा प्रसार होत असून, राज्यभरात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये एका तरुणाचा h3n2 चा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. अहमदनगरमधील विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हा विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होता.

आधी कोविड पॉझिटिव्ह नंतर एच3एन2 चा संसर्ग

23 वर्षीय तरुण मूळचा औरंगाबादचा असून, तो शिक्षणानिमित्त अहमदनगरला होता. मयत तरुण गेल्या आठवड्यात मित्रांसोबत कोकणात फिरायला गेला होता. फिरून आल्यानंतर सदरील तरुणाची तब्येत बिघडली. त्याची टेस्ट करण्यात आल्यानंतर तो कोविड पॉझिटिव्ह निघाला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

covid 19 deaths: काळजी घ्या, धोका वाढला! महाराष्ट्रात कोरोनाने घेतले दोन बळी

त्यानंतर त्याला अहमदनगरमधील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. सोमवारी रात्री 10 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत तरुणांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याच्या रक्तात h3n2 विषाणू आढळून आला.

मयत तरुणासोबत गेलेले इतर विद्यार्थीही पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरने सांगितलं. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख हे पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती देणार आहे.

ADVERTISEMENT

नागपुरात एच3एन2चा पहिला बळी?

वायरल इन्फेक्शन असलेल्या एच3एन2 या विषाणू ने नागपूर मध्ये आपले पाय पसरायला आता सुरुवात केली आहे. या विषाणूचे रुग्ण शहरभर वाढत असतानाच एका 78 वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे. मात्र, आरोग्य विभागाने डेथ ऑडिट झाल्यावरच या मृत्यूची नोंद करून घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT

नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील 78 वर्षीय रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. रुग्णाला क्रॉनिक ऍबस्ट्रक्टिव्ह पलमोनरी डिसीज (सीओपीडी) मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या सहव्याधी होत्या. उपचार सुरू असतानाच 9 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याची केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला देण्यात आली.

नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन यांनी सांगितलं की, या मृत्यूला सध्या तरी संशयित म्हणून पाहिले जात आहे. बुधवारी डेथ ऑडिट समिती समोर हे प्रकरण आल्यावर व त्यांनी मान्यता दिल्यावरच या मृत्यूची एच3एन2 चा मृत्यू म्हणून नोंद होईल, असं ते म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT