Maharashtra HSC Result 2023: बारावीचा निकाल अवघ्या काही तासात, पण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra HSC: 12th online result will be declared on 25 may 2023 at 2 pm know important things about the result
Maharashtra HSC: 12th online result will be declared on 25 may 2023 at 2 pm know important things about the result
social share
google news

Maharashtra Board Result 2023: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल (Maharashtra board HSC result 2021) आज (25 मे) जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा नेमका निकाल आणि विभागवार निकाल बोर्डाने जाहीर केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना त्यांचा नेमका निकाल हा दुपारी 2 वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे आता या निकालासाठी अवघे काही तास उरले असून विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालांची विभागवार माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाईल. (hsc 12th online result will be declared on 25 may 2023 at 2 pm know important things about the result)

बारावीच्या विद्यार्थ्यांना पाहता येणार ऑनलाइन निकाल:

www.maharashtraeducation.com आणि www.examresults.net/maharashtra या दोन वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल पाहता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे.

HSC Result 2023: विभागानुसार निकाल

  1. कोकण – 96.01 टक्के
  2. पुणे – 93.34 टक्के
  3. कोल्हापूर – 93.28 टक्के
  4. अमरावती – 92.75 टक्के
  5. छत्रपती संभाजीनगर – 91.85 टक्के
  6. नाशिक – 91.66 टक्के
  7. लातूर – 90.37 टक्के
  8. नागपूर – 90.35 टक्के
  9. मुबंई – 88.13 टक्के

बारावीच्या निकालात मुलींची बाजी

बारावीच्या निकालात यंदाही नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. यावेळी राज्यात मुलींचा निकाल हा 93.73 टक्के लागला असून मुलांचा निकाल हा 89.14 टक्के इतका लागला आहे. अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाच्या गोष्टी:

  • निकाल जाहीर करण्याचा अधिकार – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
  • अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in
  • निकालाची तारीख – 25 मे 2023
  • निकालाची वेळ – दुपारी 2.00 वाजता

12वीचा निकाल 2023 – कशी असेल ग्रेडिंग सिस्टम?

  • 75 टक्के आणि त्यापुढे – Distinction
  • 60 टक्के आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)
  • 45 टक्के to 59 टक्के – द्वितीय श्रेणी (Second Class)
  • 35 टक्के to 44 टक्के – उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)
  • 35 टक्के पेक्षा कमी – अनुत्तीर्ण (Fail)

HSC Result 2023: निकाल या वेबसाइटवर पाहता येणार (List of Websites for Result)

2022 साली बारावीचा विभागनुसार निकाल कसा होता?

  • कोकण – 97.21 टक्के
  • नागपूर – 96.52 टक्के
  • अमरावती – 96.34 टक्के
  • लातूर – 95.25 टक्के
  • कोल्हापूर – 95.07 टक्के
  • नाशिक – 95.03 टक्के
  • छत्रपती संभाजीनगर – 94.97 टक्के
  • पुणे- 93.61 टक्के
  • मुंबई- 90.91 टक्के

बारावी निकालाची तारीख आणि वेळ (Maharashtra HSC Result 2023 Date and Time)

  1. निकाल – Maharashtra HSC Result 2023 (महाराष्ट्र एचएससी निकाल 2021 )
  2. निकालाची तारीख – 25 मे 2023
  3. निकालाची वेळ – दुपारी 2.00 वाजता

    follow whatsapp

    ADVERTISEMENT