Kasba Peth : हेमंत रासने अडचणीत? रुपाली पाटलांची तक्रार, गुन्हा दाखल - Mumbai Tak - kasba peth election fir registered against hemant rasane after rupali patil thombare filed complaint - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

Kasba Peth : हेमंत रासने अडचणीत? रुपाली पाटलांची तक्रार, गुन्हा दाखल

Kasba Peth Election। Rupali Patil Thombare filed complaint against hemant Rasane: भाजपचे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी हेमंत रासने यांच्याविरुद्ध निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली […]

Kasba Peth Election। Rupali Patil Thombare filed complaint against hemant Rasane: भाजपचे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी हेमंत रासने यांच्याविरुद्ध निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध कसबा पेठ पोटनिवडणुकीचे निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांच्याकडे तक्रार केली होती. रुपाली पाटील यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे की, “कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना नू.म.वि. प्रशालेत असणाऱ्या बूथवर भाजपचे उमेदवार हेमंत रासने गळ्यात भाजप पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी घालून आले होते.”

भाजपचं चिन्ह असलेला रुमाल गळ्यात घालून मतदान केंद्रात; रुपाली पाटलांनी काय केलीये मागणी?

“त्यांनी भाजपचं चिन्ह असलेला रुमाल घालून मतदान केंद्रात प्रवेश केला. तसेच मतदानही केलं. सदरची घटना माध्यमांनी चित्रित केलेली असून, या प्रकारामुळे हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांना पोलिसांनी वा अधिकाऱ्यांनी प्रतिबंध का केला नाही,” असा सवालही रुपाली पाटील ठोंबरे यांनी तक्रारीत केलेला आहे.

kasba peth, Chinchwad: चिंचवड-कसब्यात मतदारांची पाठ, आता प्रतिक्षा निकालाची

“निवडणूक नियमावलीचे मतदानादिवशी भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी उल्लंघन केले असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच उमेदवारी रद्द करावी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी”, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे.

आचारसंहितेचा भंग : हेमंत रासने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात मतदानाला जाताना पक्षाचे उपरने घालून मतदानाला गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘फडणवीस, महाजनांना आत घाला म्हणजे…’, एकनाथ शिंदेंनी केला गौप्यस्फोट

त्याचबरोबर गणेश बिडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात बिडकर पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली होती. या प्रकरणी भाजपचे गणेश बिडकर यांच्यावर देखील अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुणे झोन एकचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी मुंबई Takशी बोलताना ही माहिती दिली.

Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!