Mumbai Weather: मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, प्रचंड मुसळधार पाऊस कोसळणार.. लोकल ट्रेनचं काय आहे स्टेट्स?

मुंबई तक

Mumbai Weather Today: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यांमध्ये २५ जुलै २०२५ रोजी ढगाळ वातावरण, हलक्या ते मुसळधार पाऊस, आणि दमट हवामानाची अपेक्षा आहे. तसेच ऑरेंज अलर्टमुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Weather (फोटो सौजन्य: Grok)
Mumbai Weather (फोटो सौजन्य: Grok)
social share
google news

मुंबई: भारतीय हवामान खात्याने (IMD) आज (25 जुलै) मुंबई, नवी मुंबई, ठाणेसाठी ऑरेंज आणि पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनमुळे या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या हवामानामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरांचा हवामान अंदाज

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.ऑरेंज अलर्ट जारी करण्याता आल्याने काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद होऊ शकते.

  • तापमान: कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
  • आर्द्रता: आर्द्रतेचे प्रमाण 80-90% राहील, ज्यामुळे दमट वातावरण जाणवेल.
  • वाऱ्याची स्थिती: किनारी भागात वारे 20-30 किमी/तास वेगाने वाहतील, आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
  • भरती-ओहोटी: आज दुपारी सुमारे 3 वाजता भरती (अंदाजे 4.5 मीटर) अपेक्षित आहे.

हे ही वाचा>> गृह मंत्रालयाकडून मेगाभरती, गुप्तचर यंत्रणेत सहभागी होण्याची संधी अन्... 10 वी पास तरुणांनी आत्ताच करा अर्ज

लोकल ट्रेनची स्थिती काय?

मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. तर मुंबईतील सखल भागातील रस्ते देखील पाण्याखाली जाऊ शकतात. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडणं हे सोयीस्कर राहील.

नवी मुंबई

नवी मुंबईतही आज पावसाचा जोर कायम राहील. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, आणि घणसोली यांसारख्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

ठाणे

ठाणे जिल्ह्यात, विशेषतः ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, आणि भिवंडी येथे ढगाळ वातावरणासह हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येथील नदी-नाले तुडुंब भरून वाहू शकतात.

हे ही वाचा>> Hotel Bhagyashree: 'ठार मारून फेकून देऊ...' हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला गाडीत कोंबलं अन्... 'त्या' घटनेने मोठी खळबळ

पालघर

पालघर जिल्ह्यात (वसई, डहाणू, तलासरी, जव्हार, बोईसर) आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळी किनारी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात सखल ठिकाणी पाणी साचण्याचा धोका आहे. 

विशेष सूचना: समुद्रकिनारी उंच लाट उसळू शकतात असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याचे अपडेट्स

हवामान खात्याने सांगितले आहे की, कोकण किनारपट्टीवर मान्सून अधिक जास्त सक्रीय होण्याची शक्यता असल्याने आज (25 जुलै) रोजीही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp