"वहिनी, प्लीज कॅफेमध्ये भेटायला या..." पतीच्या विश्वासू मित्रानेच केला ‘तो’ धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीसोबतच चीड आणणारा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. पीडिता कॅफेमध्ये भेटायला गेली असता तिथे आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीच्या मित्राने फोन करुन कॅफेमध्ये बोलावलं

पीडितेसोबत कॅफेमध्ये घडला धक्कादायक प्रकार
Crime News: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीसोबतच चीड आणणारा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. प्रकरणातील पीडित महिला पतीच्या मित्राच्या सांगण्यावरून त्याला कॅफेमध्ये भेटायला गेली. आरोपी तरुण हा पीडित महिलेच्या पतीचा चांगला मित्र असल्याकारणाने पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला. महिला कॅफेमध्ये भेटायला गेली असता आरोपी तरुण तिला कॅफेमधील एका सीक्रेट कॅबिनमध्ये घेऊन गेला. तिथे आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यावेळी पीडिता मदतीसाठी जोरजोरात ओरडत असून सुद्धा तिची कोणीच मदत केली नाही. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडितेला याबद्दल कोणालाही सांगितलं तर जीवे मारून टाकण्याची धमकीसुद्धा दिली.
तीन आरोपींना अटक
पीडितेने सुरुवातीला घाबरुन या प्रकरणाबद्दल कोणालाच काहीही सांगितलं नाही. पण नंतर शेवटी तिने आधारताल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी लगेच यावर कारवाई करत पीडितेच्या तक्रारीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा: 'माझा नवरा तर पलंगावरून खाली...' पत्नीला दिरासोबत एका खोलीत पाहिलं अन् जाब विचारताच घडलं 'असं' की...
सीक्रेट कॅबिनमध्ये नेलं अन्...
पोलिसांच्या माहितीनुसार, आधारतालची रहिवासी असलेल्या महिलेने तिच्यासोबत आपल्या पतीच्या मित्राने दृष्कृत्य केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, प्रकरणातील आरोपीचं नाव मोहित पटेल असून त्याने आपल्या मित्राच्या पत्नीला आधारतालच्या मून लाइट कॅफेमध्ये भेटायला बोलावलं. आरोपीने पीडितेला फोन केला आणि तिच्याशी काहीतरी बोलायचं असल्याचं सांगितलं. पीडिता कॅफेमध्ये पोहचली असता तिला आरोपी एका कॅबिनमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याने पीडितेचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. आरोपीच्या वागण्याला पीडितेने विरोध केला असता त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर याबद्दल कोणालाही सांगितलं तर जीवे मारून टाकण्याची धमकीसुद्धा आरोपीने दिली.
हे ही वाचा: शेतात सापडले नव्या नवरीचे कपडे; ड्रोन उडवून पाहिलं तर... हनीमूनचं 'ते' रहस्य आलं समोर!
पोलिसांचा तपास
पतीचा चांगला मित्र असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून आपण कॅफेमध्ये गेल्याचं पीडितेने सांगितलं. आधारताल पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी मोहित पटेलसह कॅफेचे संचालक अमन राठौर आणि प्रिन्स रजकला अटक करण्यात आली आहे. परंतु, पीडित महिला पतीच्या मित्राच्या सांगण्यावरून कॅफेमध्ये कशी गेली? तिने आरोपीवर सहज विश्वास कसा ठेवला? असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या, पोलीस आरोपींची चौकशी करत असून प्रकरणाचा तपासात व्यस्त असल्याचं सांगितलं जात आहे.