Mumbai Weather: मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत पाऊस गायब, आज तरी वरूणराजा हजेरी लावणार?
Mumbai Weather Today: जुलै 2025 मध्ये मुंबईत मान्सूनच्या पावसाची तीव्रता तुलनेने कमी आहे, आणि गेल्या दशकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. ही परिस्थिती 30 जुलैलाही कायम राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्र (MMRDA) मधील हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने (IMD) अंदाज व्यक्त केला आहे. ज्यानुसार, मुंबई आणि नजीकच्या परिसरात पावसाच्या अधूनमधून सरी बरसतील. याशिवाय इतरही काही जवळच्या जिल्ह्यात अशाचा स्वरूपाचं वातावरण असेल.
मुंबई आणि MMRDA मधील हवामान
मुंबई शहर, उपनगरे आणि MMRDA परिसरात (ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पालघर इ.) आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मान्सूनचा प्रभाव कायम असल्याने अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
29 जुलै 2025 च्या IMD अंदाजानुसार, मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, आणि ही परिस्थिती 30 जुलैलाही कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथेही समान परिस्थिती अपेक्षित आहे.
1. मुंबई शहर आणि उपनगरे:
दक्षिण मुंबई (गेटवे ऑफ इंडिया, कोलाबा, मरिन ड्राइव्ह), दादर, सायन, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, चेंबूर आणि भांडुप यांसारख्या भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात (जसे की दादर, अंधेरी, सायन) पाणी साचण्याचा धोका आहे, विशेषतः भरतीच्या वेळी.









