पत्नी 23 वर्षाने लहान होती म्हणून पतीला यायचा 'तो' सशंय, पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आपल्याच पत्नीची एका व्यक्तीने निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी पती आणि पीडित पत्नीच्या वयामध्ये 23 वर्षांचा फरक असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

23 वर्षे लहान तरुणीसोबत केलं दुसरं लग्न

पत्नी वयाने अधिक लहान असल्यामुळे पतीच्या मनात आला संशय

पतीने केली पत्नीची निर्घृणपणे हत्या
Crime News: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आपल्याच पत्नीची एका व्यक्तीने निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. साहिबा नावाच्या महिलेची तिच्या पती नजाकतने क्रूरपणे हत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आरोपी नजाकतने दोनदा लग्न केलं असून साहिबा ही त्याची दुसरी पत्नी होती. पण साहिबा नजाकतपेक्षा 25 वर्षांनी लहान होती. वयाच्या या अंतरामुळे नजाकतच्या मनात विचित्र विचार येऊ लागले आणि याच कारणामुळे त्याने आपल्या पत्नीवर अत्याचार करून तिची हत्या केली.
पती पत्नीमध्ये 23 वर्षांचा फरक
हे संपूर्ण प्रकरण बिजनौरच्या नजीबाबाद पोलीस स्टेशन परिसरातील अलीपुरा गावातील असल्याचं समोर आलं आहे. येथे 55 वर्षीय नजाकतने त्याची दुसरी पत्नी साहिबाची हत्या केली. साहिबा 32 वर्षांची असून पती पत्नीमध्ये 23 वर्षांचा फरक होता. नजाकतने त्याची दुसरी पत्नी साहिबावर चाकूने हल्ला केला आणि तिच्यावर अनेक वार केल्याचं सांगितलं जात आहे. या प्राणघातक हल्ल्यात पीडित महिला गंभीररित्या जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: मॉल संस्कृती आता गावा-गावात पोहचणार, फडणवीस सरकार उभारणार 'उमेद मॉल'; Cabinet बैठकीतील 8 मोठे निर्णय
हत्येनंतर स्वतः कीटकनाशक प्यायलं
संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी नजाकतला ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, हत्येनंतर आरोपी नजाकतने स्वतः कीटकनाशक प्यायलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दंडाचा मोठा फटका! एका खड्ड्यामागे तब्बल 15,000 रुपये...
पत्नी वयाने खूपच लहान असल्यामुळे तिच्यावर संशय...
नजाकतची दुसरी पत्नी साहिबा त्याच्यापेक्षा खूपच लहान असल्याचं तपासात दिसून आलं. पत्नी आपल्यापेक्षा वयाने खूपच लहान असल्यामुळे नजाकत नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा. त्याच्या या संशयामुळे त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ लागला. अशातच, त्याने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. एससी सिटी संजीव वाजपेयी यांनीही घटनास्थळी जाऊन प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणात कारवाई करत आहेत.