'दुसऱ्याच तरुणासोबत...' प्रेयसीचं 'ते' रहस्य कळलं आणि डिप्रेशनमध्ये गेला, नंतर विष प्यायलं अन्...
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मध्ये एका तरुणाने आपल्या प्रेमासाठी विष पिऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. पीडित तरुणाला त्याच्या प्रेयसीबद्दल असं रहस्य कळालं, जे तो सहनच करु शकला नाही. जाणून घ्या, संपूर्ण घटना.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेयसीचं 'ते' रहस्य समजल्याने तरुणाची आत्महत्या

प्रेमासाठी तरुणाने विष पिऊन जीवन संपवलं..
Suicide Case: खरंतर, आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचं पहिलं प्रेम शेवटपर्यंत टिकेलंच, याची काहीच शाश्वती नसते. काहींच प्रेम यशस्वी होतं तर काहींना ते अर्ध्यातच सोडावं लागतं. अशातच, आधीच्या प्रेमसंबंधातून बाहेर पडणं अनेकांना जमत नसल्याचं आपण पाहतो. अशा अवस्थेत ते भलतंच काहीतरी करुन बसतात आणि तेच त्यांच्या जीवावर बेततं. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मधून अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेमासाठी विष पिऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. पीडित तरुणाला त्याच्या प्रेयसीबद्दल असं रहस्य कळालं, जे तो सहनच करु शकला नाही. जाणून घ्या, संपूर्ण घटना.
विष पिऊन आत्महत्या
ही घटना पहासू पोलीस स्टेशन परिसरातील फजलपुर गावातील असल्याचं समोर आलं आहे. येथील रहिवासी असलेल्या अरुण नावाच्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. विष घेतल्यानंतर तरुणाची तब्येत बिघडली आणि त्याला कुटुंबियांकडून तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पीडित तरुणाची अवस्था गंभीर असल्याकारणाने तिथे त्याला हायर सेंटर रेफर करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हे ही वाचा: लातूर हादरलं! पत्नीनं पतीला विचारला प्रश्न, उत्तर देण्याऐवजी पती संतापला अन् पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळलं
घटनेत मृत पावलेला तरुण पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण करुन कासिमपूर पॉवर हाऊसमध्ये अप्रेन्टिसशिप करत होता. त्याच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबिय अतिशय दुःखी आहेत. परंतु, या प्रकरणी कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रेयसीचं दुसऱ्याच मुलासोबत लग्न...
पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणचे शेजारच्या गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, संबंधित तरुणीचं दुसऱ्याच मुलासोबत लग्न ठरवण्यात आलं होतं. यामुळे अरुण डिप्रेशनमध्ये गेला. कुटुंबियांनी सुद्धा अरुणला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीसुद्धा तो सतत नाराज असायचा. त्यावेळी अरुणच्या डोक्यात नेमके कोणते विचार सुरू होते, याची कोणालाच कल्पना नव्हती. त्याच्या प्रेयसीचं लग्न ठरल्याच्या बातमीने तो इतका निराश झाला की त्याने त्या दुःखात विष प्राशन केले. त्याला तातडीने अलीगढमधील वरुण रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: 'जगातील कोणत्याही नेत्याने 'ऑपरेशन सिंदूर' बंद करा असं सांगितले नाही', पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करून टाकलं
पोलिसांनी दिली माहिती
पीडित तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. प्रकरणाची माहिती देताना सीओ मधुप कुमार सिंह म्हणाले की, "या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास केला जात आहे. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप प्रकरणासंबंधी कोणतीही तक्रार आली नसून तक्रारीच्या आधारे कारवाई केली जाईल."