अल्पवयीन मतिमंद मुलीला बांधकाम सुुरु असणाऱ्या खोलीत नेलं, नंतर 55 वर्षीय नराधमाने केले अत्याचार

मुंबई तक

Gadchiroli crime : विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात कोरची शहरात एक माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पुरुषाने एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

gadchiroli crime
gadchiroli crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गडचिरेली जिल्ह्यातील कोरची शहरात माणुसकीला काळिमा

point

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

point

नेमकं काय घडलं?

Gadchiroli Crime : विदर्भातील गडचिरेली जिल्ह्यातील कोरची शहरात एक माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पुरुषाने एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी नागरिकांना हाताशी धरून आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव बंडू शहारे (वय 55) राहणार हेटाळकसा, ता. कोरची असे आरोपीचं नाव आहे.

हे ही वाचा : वयाच्या 54 व्या वर्षी महिलेनं 17 व्या बाळाला दिला जन्म, डॉक्टरही चक्रावून गेले, पालनपोषणासाठी 20 टक्के दराने घेतात पैसे

मुलीला बांधकाम सुरु असलेल्या एका घरात नेले...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला बांधकाम सुरु असलेल्या एका घरात नेले, तेव्हा एका महिलेनं हा धक्कादायक प्रकार पाहिला. महिलेला ही बाब लक्षात येताच तिने तक्रारदारास ही बाब सांगितली आणि सेविकांसोबत खोलीत धाव घेतली. तेव्हा नराधम पुरुष हा मुलीवर अतिप्रसंग करत असताना दिसत होता.

आरोपीने सायकलवरून पळ काढला अन्...

तक्रारदार आणि आशा सेविका यांनी पीडितेला आरोपीच्या तावडीतून सोडवण्यात यश आले. मात्र, आरोपीने सायकलवरून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. तक्रारदाराने आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी उपस्थितांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली दिले होते. संबंधित प्रकरणात पीडितेला रुग्णालयात दाखल केले. संबंधित प्रकरणात कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 117/25 नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. 

हे ही वाचा : 75 वर्षीय वृद्धाचा 35 वर्षीय महिलेशी विवाह, मधुचंद्राच्या रात्री मृत्यू; आता पोस्टमॉर्टेममधून खळबळजनक खुलासा

संबंधित प्रकरणात आरोपीवर कलम 6 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामुळे महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp