अतिवृष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला; गेल्या 2 महिन्यात बीड जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं

मुंबई तक

Beed Farmer News : गेल्या 2 महिन्यात बीड जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गेल्या 2 महिन्यात बीड जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं

point

अतिवृष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला

Beed Farmer News : बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी रुद्र रूप धारण केले होते. त्यामुळे बाजूच्या शेती पिकाचं अतोनात नुकसान झाले असून शेतकरी राजा हवालदिल झालाय. याच दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.  अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची सून प्रियांक पवार म्हणाली, आमच्याकडे बडोदा बँकेचे कर्ज होते. गेल्या तीन वर्षापासून आम्ही या कर्जाचं नवं-जुनं करायचो. नवं-जुनं करुन घ्या असं बँकेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, शेती वाहून गेलेली असताना हे कर्ज कसं काढायचं? असं सासर्‍याला वाटत होतं.  त्यामुळे त्यांनी  टोकाचे पाऊल उचललं. घरामध्ये आम्ही चारच माणसे आहोत. अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागतो, शेतीचे कामे करून आम्ही मजुरीची कामे करायचो. आमचे सासरे सतत टेन्शनमध्ये असायचे. तितक्यात माझ्या सासूचा अपघात झाला आणि अपघातामध्ये आमचा बराच खर्च झाला. त्यामुळे व बडोदा बँकेचे असलेले कर्ज कसे फेडायचे? फार अडचणी येत होत्या. सासरे फार टेन्शनमध्ये असायचे. यावर्षी सगळं शेतातलं पीक वाहून गेलं आहे. काहीही उरलं नाही कापसाला बोंड राहिले नाहीत. सोयाबीनचे काही उरलं नाही बडोदा बँकेचे एक लाख 19 हजार रुपये कर्ज होतं. आता आमचे कर्ज माफ करावं त्याचबरोबर आम्हाला काही आर्थिक मदत देखील करावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. 

हेही वाचा : बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले; रामदास कदमांचा आरोप, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; काय म्हणाले?

यावर्षी पाऊस पडला आणि याच पावसामुळे शेतात काहीच उरलं नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. कापूस सोयाबीन होतं, तेवढं सगळं संपून गेलं. आता करायचं काय? या विवंचनेतून माझे मेहुण्यांनी हे टोकाचा पाऊल उचललं. मला सतत म्हणायचे आता हे मी कर्ज कसे फेडू? मी त्यांना अनेक वेळा सांगायचं कर्ज फिटत राहिल. मात्र तुम्ही शांत राहा. मात्र त्यांनी जी गोष्ट करायची ती केली. त्यामुळे आता सरकारने या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, अशी भावना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मेहुणा म्हणाला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp