Govt Job: 'या' बँकेत निघाली मोठ्या पदांवर भरती! लाखोंचा पगार अन्... कसं कराल अप्लाय?

मुंबई तक

राष्ट्रीय आवास बँक म्हणजेच राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) कडून विविध अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 7 पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

'या' बँकेत निघाली मोठ्या पदांवर भरती!
'या' बँकेत निघाली मोठ्या पदांवर भरती!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' बँकेत निघाली मोठ्या पदांवर भरती!

point

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Govt Job: सरकारी बँकेत नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय आवास बँक म्हणजेच राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) कडून विविध अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 7 पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. बँकिंग सेक्टरमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून उमेदवार 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना  www.nhb.org.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. 

'या' पदांवर होणार भरती

  • जनरल मॅनेजर (क्रेडिट मॉनिटरिंग): सीए/एमबीए/पीजीडीएम/पीजीडीबीएम
  • डेप्युटी मॅनेजर (ऑडिट): चार्टर्ड अकाउंटंट (सीए)
  • डेप्युटी मॅनेजर (लर्निंग अँड डेव्हलपमेंट): एमबीए/पीजीडीएम
  • डेप्युटी मॅनेजर (मानव संसाधन): एमबीए/पीजीडीएम/पीजीडीबीएम
  • जनरल मॅनेजर (मानव संसाधन, कंत्राटी): पदवीधर (मानव संसाधनात पदव्युत्तर पदवी)
  • डेप्युटी मॅनेजर (कंपनी सचिव, कंत्राटी): पदवीधर आणि आयसीएसआय सदस्यत्व
  • मुख्य अर्थशास्त्रज्ञ: अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी

किती मिळेल पगार? 

जनरल मॅनेजर (स्केल–VII): 1,56,500 रुपये ते 1,73,860 रुपये 
डेप्युटी मॅनेजर  (स्केल–II): 64,000 रुपये ते 93,960 रुपये 

हे ही वाचा: बेदम मारहाण, नंतर बोटंच छाटली अन् अखेर... मुलांसमोरच वडिलांची निर्घृण हत्या! छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं?

अर्जाचं शुल्क

प्रवर्गानुसार, उमेदवारांसाठी अर्जाचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी SC (एससी)/ ST (एसटी)/ PwBD (पीडब्ल्यूबीडी)  प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावं लागेल. याव्यतिरिक्त, इतर प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्जाचं शुल्क भरणं अनिवार्य आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp