प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी 932 किमी प्रवास... वाटेत कारमध्ये तरुणाने केलं 'असं' काही अन् झाला व्हायरल!
एका व्यक्तीने प्रेयसीला प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी 932 किमी प्रवास करताना वाटेतच केलेलं कृत्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो त्याच्या कारमधून 900 किलोमीटर प्रवास करत होता. दरम्यान, त्याने एक अनोखी पद्धत अवलंबली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी 932 किमी प्रवास...
वाटेत कारमध्ये तरुणाने केलं 'असं' काही अन् झाला व्हायरल!
Viral Story: चीनमधील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने लग्नाच्या प्रस्ताव घेऊन जाताना वाटेतच केलेलं कृत्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो मॅरेज प्रपोजल घेऊन जाण्यासाठी त्याच्या कारमधून 900 किलोमीटर प्रवास करत होता. दरम्यान, चीनच्या वर्दळीच्या महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्याने एक अनोखी पद्धत अवलंबली. त्याने त्याच्या कारच्या मागील खिडकीवर लाल बॅनर लावला आणि लग्नाचा प्रस्ताव घेऊन जात असल्याचं सांगून इतर ड्रायव्हर्सना रस्ता सोडण्याची विनंती केली.
बॅनर ठरला फायदेशीर...
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक बॅनर दिसून येत आहे ज्यावर लिहिलं होतं, "भावांनो, मला आधी जाऊ द्या. मी माझ्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी गुइझोऊला जात आहे." 26 वर्षीय टॅन नावाचा तरुण मध्य चीनच्या जियांग्शी प्रांतातील असून तो देशाच्या आग्नेय भागातील फुजियान प्रांतात व्यवसाय करतो. टॅनने जियांग्शी टीव्हीला माहिती देताना सांगितलं की, त्याची प्रेयसी चिनी नववर्षासाठी चीनमधील गुइझोऊ येथील तिच्या होमटाउनला गेली होती.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, टॅन आणि त्याची प्रेयसी पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटले होते आणि गेल्या चार वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. टॅन म्हणाला की, हा बॅनर त्याला स्प्रिंग फेस्टिव्हल ट्रॅफिकमध्ये नेव्हिगेट करण्यास आणि वाटेतील इतर ड्रायव्हर्ससोबत त्याचा आनंद शेअर करण्यासाठी फायदेशीर ठरला. त्याने पुढे म्हटलं की तो तिला प्रपोज करणार असल्याची त्याच्या प्रेयसीला काहीच कल्पना नव्हती. म्हणून तो तिथे पोहोचल्यानंतर त्याला पाहून त्याच्या प्रेयसीला आश्चर्य वाटलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर : मुंबई-गोवा हायवेचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार... सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मोठी अपडेट
वृत्तानुसार, टॅनने जियांग्शी ते गुइझोऊ हे 932 किलोमीटर अंतर साडेबारा तासांत एकट्याने प्रवास केला. त्यानंतर, तिथे पोहोचल्यानंतर त्याच्या प्रेयसीने अगदी आनंदाने त्याचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर ते 26 फेब्रुवारी रोजी एकत्र जियांग्शीला परतले. टॅनने सांगितलं की, बॅनरमुळे प्रभावित झालेल्या अनेक ड्रायव्हर्सनी त्याला रस्ता मोकळा करण्यास मदत केली आणि काहींनी तर हॉर्न वाजवून आनंद व्यक्त केला. टॅनने सांगितलं की, प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान एक ड्रायव्हर त्याचे स्वागत करण्यासाठी त्याच्या गाडीतून उतरला.










