रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; भारताचं नेतृत्व कोण करणार?
Team India Squad : रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; भारताचं नेतृत्व कोण करणार?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Team India Squad : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआयची शनिवारी (दि.4) एक दीर्घ बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 26 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल याची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून ही जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता टेस्ट आणि वनडे दोन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिलकडे असेल. या बैठकीनंतरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
बीसीसीआयने टीम सिलेक्शन मीटिंगनंतर हा निर्णय घेतला. टेस्टनंतर वनडे संघाचीही कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडून काढून घेण्यात आली आहे. मात्र, रोहित शर्मा आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेत टीम इंडियाचा भाग असतील. दोघांचाही 15 खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
शुभमन गिल वनडे कर्णधार म्हणून 19 ऑक्टोबर रोजी पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे . त्यानंतर दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडिलेडमध्ये आणि तिसरा व शेवटचा सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळवला जाईल.