गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा पोलिसांना फोन; रोहित पवार म्हणाले, पुण्यातील गुंड परदेशात...

मुंबई तक

Chandrakant Patil on Gautami Patil, Pune : गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा डीसीपी संभाजी पाटलांना फोन; रोहित पवार म्हणाले, पुण्यातील गुंड...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा पोलिसांना फोन

point

पीडित कुटुंबाला गौतमी पाटीलने मदत करावी, चंद्रकांत पाटलांची मागणी

Chandrakant Patil on Gautami Patil, Pune : काही दिवसांपूर्वी नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या कारने एका रिक्षाला उडवलं होतं. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील ही कारमध्ये नसल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आता गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना ना. पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा : मुंबईच्या महिला 'डान्सर'वर बलात्कार! डान्स प्रॅक्टिसच्या नावाखाली खोलीत नेलं अन् दारू पाजून... पॉश एरिआत घडली घटना

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागूनजोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर प्रकरणी आज मरगळे कुटुंबियांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन; मदतीची मागणी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना फोन करुन दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले. यावेळी गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

हेही वाचा : पिंजरा फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे वाचलं का?

    follow whatsapp