मुंबईच्या महिला 'डान्सर'वर बलात्कार! डान्स प्रॅक्टिसच्या नावाखाली खोलीत नेलं अन् दारू पाजून... पॉश एरिआत घडली घटना

मुंबई तक

मुंबईतील नर्तिकेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पुरुष डान्सरनेच हे घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईच्या महिला 'डान्सर'वर बलात्कार!
मुंबईच्या महिला 'डान्सर'वर बलात्कार!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या महिला 'डान्सर'वर बलात्कार!

point

डान्स प्रॅक्टिसच्या नावाखाली केलं घृणास्पद कृत्य

Mumbai Crime: मुंबईतील नर्तिकेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पुरुष डान्सरनेच हे घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अटक केली आहे. ही घटना गोरेगावमध्ये घडल्याचं पीडितेने सांगितलं. संबंधित नर्तिका ही मेघालयची मूळ रहिवासी असून आरोपी डान्सर हा मालाड पश्चिम येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणासंबंधी एफआयआर दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता, मात्र आता पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पीडितेने आरोप केला की स्विमिंग पूलमध्ये विश्रांती घेऊन संबंधित महिला आणि आरोपीने नृत्याचा सराव केला. त्यानंतर त्या दोघांनी जेवण ऑर्डर केलं आणि त्यावेळी त्यांनी मद्यपान सुद्धा केलं. दरम्यान, आरोपी तरुणाने नर्तिकेवर बलात्कार केला. 

हे ही वाचा: पत्नी करायची नको ते काम! पतीला भनक लागताच नातेवाईकांसोबत मिळून रचला मोठा कट अन् नंतर...

नृत्याच्या सरावानंतर केलं घृणास्पद कृत्य 

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, संबंधित घटना 17 मार्च 2025 रोजी गोरेगाव पश्चिम येथील आरे कॉलनीमधील रॉयल पाम्सच्या एका व्हिलामध्ये घडली. पीडित महिला आणि आरोपी तरुण नृत्याच्या पेशात अशून दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. दोघांनी यापूर्वी सुद्धा एकत्र काम केलं असून ते त्यांच्या सादरीकरणासाठी गोव्याला देखील जात होते. मुंबईत परतल्यानंतर, पीडितेने डान्स शिकण्यासाठी आरोपी डान्सरशी संपर्क साधला. सुरुवातीला, त्यांनी नृत्याच्या सरावासाठी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी ते उपलब्ध नव्हतं. त्यानंतर, त्यांनी आरे कॉलनीमधील रॉयल पाम्समध्ये नृत्याचा सराव करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी, डान्स प्रॅक्टिस झाल्यानंतर दोघांनी जेवण ऑर्डर केलं आणि त्यावेळी दारू प्यायली. यादरम्यान, आरोपी तरुणाने पीडित महिलेवर बलात्कार केला. 

हे ही वाचा: 15 वर्षाच्या मुलीला सांगितलं तुला हिरोईन बनवतो, नंतर प्रोड्यूसरने भलतंच काही केलं अन्...

पीडितेने पोलिसांना सगळंच सांगितलं 

इतकेच नव्हे तर, आरोपीने पीडितेला नृत्याच्या सरावासोबत नोकरी देण्याचं सुद्धा आश्वासन दिलं होतं. आशुतोष मोहंती अशी आरोपी तरुणाची ओळख असल्याचं समोर आलं आहे. डान्स प्रॅक्टिसच्या नावाखाली आरोपीने नर्तिकेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि पीडितेने या सगळ्याला विरोध केल्यानंतर देखील त्याने तिच्यासोबत बळजबरीने घृणास्पद कृत्य केलं. बदनामी होण्याच्या भितीने महिला सुरुवातीला गप्प राहिली पण, नंतर तिने वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेने सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरे पोलीस स्टेशनमध्ये आरोपी तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाबाबत गुन्हा केला असून त्याच दिवशी संबंधित तरुणाला अटक केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp