15 वर्षाच्या मुलीला सांगितलं तुला हिरोईन बनवतो, नंतर प्रोड्यूसरने भलतंच काही केलं अन्...

मुंबई तक

Crime News : तुला चित्रपटात काम देतो असे सांगून एका निर्मात्याने एका अल्पवयीन मुलीवर दीड वर्षे बलात्कार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निर्मात्याने मुलीचं दीड वर्षे केलं लैंगिक शोषण

point

नेमकं काय घडलं?

Crime News : तुला चित्रपटात काम देतो असे सांगून एका निर्मात्याने एका अल्पवयीन मुलीवर दीड वर्षे बलात्कार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलीचं वय वर्षे हे 15 असल्याचं सांगण्यात येत आहे. तथापि, पीडितेनं धाडस दाखवत 1 ऑक्टोबर रोजी विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी करवाई केली. ही घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. संबंधित प्रकरणात तरुणाला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 'चोली के पीछे क्या है', मुलींना पाहून तरुण म्हणू लागला गाणं, भररस्त्यात नेमकं काय घडलं?

पीडितेनं तक्रारीत काय म्हटलं?

आयटीआयची विद्यार्थिनी असलेल्या पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलं की, दोन वर्षांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर गुजराती चित्रपटांमध्ये काम करणाऱ्यांसाठी ऑडिशन्सची जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. मुलीने जाहिरातीत नंबरवर कॉल केला होता आणि राजकोट शहरातील साधू वासवानी रोडवरील आरोपीच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तिच्यासोबत तिची आईही त्याठिकाणी होती.

नंतर आरोपीने मुलीला ऑडिशनसाठी बोलावले आणि सांगितलं की, तिला अभिनय आणि डयलॉग डिलिव्हरीवरती लक्ष देणं गरजेचं आणि त्यात आणखी थोडा बदल करणं गरजेचं आहे. जर तिने तिचे अनुभवाचे कौशल्य सुधारल्यास तिला चित्रपटात प्रमुख भूमिका देण्याचे आश्वासन दिलं.

दरम्यान, पोलीस एफआरआयनुसार, एका प्रशिक्षण सत्रादरम्यान, आरोपीने पीडितेला सांगितलं की तिला त्याच्यासोबत एक इंटिमेंट सीन करावा लागेल. त्यानंतर आरोपीने मुलीचा विनयभंग केला आणि तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पीडितेनं विरोध दर्शवत प्रशिक्षणाच्या सत्रांना येण्यास टाळाटाळ केली. तेव्हा आरोपीने तिच्या आईला फोन करून मुलाला पुन्हा आणा असा दबाव आणला.

हे वाचलं का?

    follow whatsapp