पत्नी करायची नको ते काम! पतीला भनक लागताच नातेवाईकांसोबत मिळून रचला मोठा कट अन् नंतर...
जंगलात पोलिसांना एका महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा करताना नेमकी काय माहिती दिली? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नी करायची नको ते काम!

पतीला भनक लागताच रचला मोठा कट अन् नंतर...
Crime News: राजस्थानमधील करौली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील लांगरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका जंगलात पोलिसांना एका महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा करताना सांगितलं की मृत महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी मिळून हा डबल मर्डर घडवून आणला. पोलिसांनी फॉरेन्सिक तपास, एफएसएल रिपोर्ट्स आणि डिजीटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
पत्नीचे गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध
दोन दिवसांपूर्वी कुमरावतपुराच्या जंगलात रंजीता मीणा नावाची महिला आणि गावातील रहिवासी असलेल्या निरंजन मीणा नावाच्या तरुणाचे मृतदेह आढळले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेचा खोल तपास केल्यानंतर याबाबत बरेच खुलासे समोर आले. रंजीताचे गावातीलच निरंजनसोबत अनैतिक संबंध असल्याचं तपासात समोर आलं. याच कारणामुळे पती आणि पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. 26 सप्टेंबर रोजी याच गोष्टीवरून दोघांमध्ये मोठा वाद झाला होता.
हे ही वाचा: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने गुपचूप उरकला साखरपुडा, लग्नाची तारीखही ठरली?
पती आणि नातेवाईकांनी मिळून रचला कट
या वादानंतर, महिलेच्या पतीने आपल्या दोन नातेवाईकांसोबत मिळून एक कट रचला. त्यावेळी, तिघांनी रंजीता आणि निरंजनला जंगलात बोलवलं आणि त्यांची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आधी पीडित महिला आणि तिच्या प्रियकराचा गळा दाबला आणि नंतर, त्यांच्यावर दगडाने वार करून त्यांची हत्या केली. हत्येनंतर, पतीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून लांगरा पोलीस स्टेशनमध्ये आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: 15 वर्षाच्या मुलीला सांगितलं तुला हिरोईन बनवतो, नंतर प्रोड्यूसरने भलतंच काही केलं अन्...
फॉरेन्सिक तपासात झाला खुलासा
पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि फॉरेन्सिक टीमच्या तपासावरून घटनेचा खुलासा करण्यात आला. तसेच, डिजीटल पुराव्यांच्या आधारे सुद्धा पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचता आलं. कठोर चौकशीदरम्यान, आरोपी पतीने गुन्हा कबूल केला आणि त्यानंतर आरोपी पती आणि या हत्येत समावेश असलेल्या दोन नातेवाईकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की रंजीता आणि निरंजन यांच्यामधील अनैतिक संबंध हेच या हत्येमागचं कारण होतं. दोघांमधील प्रेमसंबंधामुळे महिलेचा पती अतिशय संतापला आणि त्याने रागाच्या भरात आपल्या नातेवाईकांसोबत मिळून आपली पत्नी तसेच तिच्या प्रियकराचा खून केला. सध्या, आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.