रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने गुपचूप उरकला साखरपुडा, लग्नाची तारीखही ठरली?

मुंबई तक

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda got engaged : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने गुपचूप उरकला साखरपुडा असून दोघांच्या लग्नाची तारीख ठरल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने गुपचूप उरकला साखरपुडा

point

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली?

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda got engaged :  बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये छाप सोडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा  हे ग्लॅमरच्या जगतात सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत. दोघांनी त्यांचं नातं अधिकृत केलं नसलं, तरी त्यांचं प्रेम कुणापासूनही लपून राहत नाही. कधी ते एखाद्या कार्यक्रमाला एकत्र दिसतात, तर कधी सुट्टीवर जातात. अनेकदा रश्मिका विजयची टी-शर्ट किंवा कॅप घातलेलीही दिसली आहे. दरम्यान, आता अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी डेटिंगच्या अफवांनंतरही त्यांचं नातं कधीच सार्वजनिकपणे मान्य केलं नाही. पण त्यांच्या चाहत्यांना ते लग्नबंधनात अडकलेले पाहण्याची नेहमीच आतुरता होती. अखेर तो क्षण आलाच आहे. होय, रश्मिका आणि विजय लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात.

हेही वाचा : निलेश घायवळची धाराशिवच्या व्यापाऱ्याला धमकी? जुनी ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल

रश्मिका-विजयची साखरपुडा

मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. कुठलाही गाजावाजा न करता या जोडप्याने आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाच्या उपस्थितीत खासगी समारंभात एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन देत लग्नाचा निर्णय घेतलाय.

हे वाचलं का?

    follow whatsapp