सातारा : काकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं, गरोदर असल्याचं समजताच कोयना धरणाच्या किनारी...
Satara Crime : गरोदर आहे कोणाला समजलं तर? काकाने अल्पवयीन मुलीला जागेवर संपवलं; मृतदेह कोयनेच्या किनारी पूरला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

काकाने अल्पवयीन मुलीला जागेवर संपवलं

मृतदेह कोयना धरणाच्या किनारी पूरला
Satara Crime : आपल्या सोबत असलेली अल्पवयीन मुलगी गरोदर आहे कोणाला समजलं तर? असा विचार करुन काकानेच मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह काकाने वाजेगाव परिसरातील कोयना धरणाच्या किनारी पूरलाय. ही घटना कोयना विभागातील तळीये पश्चिम येथे घडली आहे. ज्ञानदेव तुकाराम सुतार (वय 37) असं खून करणाऱ्या काकाचं नाव आहे. पोलिसांनी या काकाला अटक केली आहे.
हेही वाचा : आमच्या काळजाचा विषय, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या WhatsApp स्टेटसला वाल्मिक कराडचे फोटो
काका असलेल्या आरोपीने मृतदेह कोयना धरणाच्या किनारी पुरला
अधिकची माहिती अशी की, ज्ञानदेव तुकाराम सुतार याने अल्पवयीन मुलीला 2024 मध्ये फूस लावून पळवून नेल होते. या प्रकरणी कोयना नगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. दरम्यान, ठाणेनगर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. यातून सर्वात मोठा खुलासा झालाय. मुलगी गरोदर असल्याचं समजताच काकाने हा सगळा प्रकार उघडकीस येईल म्हणून तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी उत्खनन करून मुलीचा मृतदेह बाहेर काढला
दरम्यान, खून केल्यानंतर काका असलेल्या आरोपीने मृतदेह कोयना धरणाच्या किनारी पुरला. आता पोलिसांनी उत्खनन करून मुलीचा मृतदेह बाहेर काढला असून, पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संशयित काकाने गुन्ह्याची कबुली करुन दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोयना धरणाच्या किनारी पुरलेला मृतहेत स्थानिक गुन्हे शाखा, तहसील प्रशासन आणि वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आलाय.