आमच्या काळजाचा विषय, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या WhatsApp स्टेटसला वाल्मिक कराडचे फोटो
Beed : जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेला शासकीय कर्मचाऱ्याकडूनच केराची टोपली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेला शासकीय कर्मचाऱ्याकडूनच केराची टोपली

वाल्मीक कराड हा संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार
Beed : बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी कालिदास सानप याने रात्री स्वतःच्या व्हाटस्अप स्टेटसला वाल्मीक कराडचे पोस्टर ठेवले. यावर 'शेवटी विषय आमच्या काळजाचा आहे WE SUPPORT WALMIK ANNA' असा खून प्रकरणातल्या आरोपीचं समर्थन करणारा मजकुर आहे. तर दुसर्या पोस्टरवर देखील मुंडे घरण्यातील सर्वांचे फोटो लावण्यात आले असून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शेजारी आरोपी वाल्मीक कराड याचा फोटो आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेला कर्मचाऱ्यांकडूनच केराची टोपली
काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीचे समर्थन करणारे बॅनर लावू नयेत किंवा त्यांचे समर्थन होईल असे कृत्य करू नये, अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. मात्र या सूचनांचे पालन न करता एका शासकीय कर्मचार्यानेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे. शिवाय खून आणि खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याला पाठिंबा दर्शवणारे पोस्टर आपल्या स्टेटसला लावले आहेत. विशेष म्हणजे हा शासकीय कर्मचारी आहे आणि त्याने आरोपीच्या केलेल्या समर्थनामुळे चर्चा होत आहे.
हेही वाचा : दारु पिऊन एसटी चालवली म्हणून गुन्हा दाखल झाला, अन् चालकाने बसमध्येच गळफास घेतला; आहिल्यानगरमधील घटना
संतोष देशमुख्य हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या वादातून अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. सध्या तो बीडच्या तुरुंगात असून जामीनासाठी वारंवार न्यायालयात अर्ज करत आहे. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय. मोक्कामधून नाव वगळण्यात यावं, यासाठी वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयात सातत्याने अर्ज केला आहे. सध्या त्याच्या वकिलांच्या टीमने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.