माझा बाप सावकार होता, बंगल्यावर ये, नाहीतर पुण्यातील दुकानं बंद पाडेल, निलेश घायवळची धाराशिवच्या व्यापाऱ्याला धमकी?

मुंबई तक

Gangster Nilesh Ghaywal : माझा बाप सावकार होता, तुझी दुकानं बंद पाडेल, निलेश घायवळची धाराशिवच्या व्यापाऱ्याला धमकी? परदेशातून फोन फिरवला

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझा बाप सावकार होता, तुझी दुकानं बंद पाडेल

point

निलेश घायवळची धाराशिवच्या व्यापाऱ्याला धमकी? परदेशातून फोन

Gangster Nilesh Ghaywal, Pune : पुण्यातून पळ काढून परदेशात गेलेल्या निलेश घायवळ या गुंडाचे कारनामे अजूनही सुरुच आहेत. निलेश घायवळने आता परदेशातून फोन फिरवण्यास सुरुवात केली आहे. "माझा बाप सावकार होता, पुण्यातील दुकानं बंद पाडेल", असं म्हणत त्याने धाराशिवच्या एका व्यापाऱ्याने धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे. यावेळी निलेश घायवळने शिवीगाळ केली असून तू सावंत साहेबांना मध्ये कशाला घेतो? असं म्हणत बंगल्यावर येण्याची धमकी दिली आहे. 

हेही वाचा : तुझे न्यूड फोटो पाठवतेस का? अक्षय कुमारच्या मुलीला घाणेरडे मेसेज पाठवले; अभिनेत्याचं पालकांना महत्त्वाचं आवाहन

पुण्यातील कुख्यात गुंड असलेल्या निलेश घायवळने काही दिवसांपूर्वी बनावट पासपोर्ट बनवून परदेशात पळ काढला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील फरार झाले होते. मात्र, परदेशात पळ काढणाऱ्या घायवळने आता फोनवरुन पुण्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केलाय का? असा प्रश्ना या ऑडिओ क्लिपमुळे निर्माण झालाय. 

निलेश घायवळ या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाला, किती वेळात येतो? तू ये मी तुला काहीही करत नाही. तुला चार शब्द बोलायचे आहेत. तू आला नाहीस आणि कोणाला इकडं तिकडं सांगितलं तर पुण्यातील दुकानं बंद करुन टाकेन. शहाना असशील तर बंगल्यावर ये. मी गरीबीतून आलो नाही. माझा बाप पहिल्यापासून सावकार होता. तुला मस्ती कशामुळे आहे. तुझ्यामुळे सावंत साहेब मोठा झाला काय? साहेबांचा आणि माझा काहीही संबंध नाही. तू बंगल्यावर ये. घाबरायचं असेल मोठ्या माणसाच्या कशाला नादी लागायचं. सावंत साहेबांचा विषय तू काढला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp