पिंजरा फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई तक

Pinjara fame Actress Sandhya Shantaram passes away : पिंजरा फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालंय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पिंजरा फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

point

वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pinjara fame Actress Sandhya Shantaram passes away : पिंजरा फेम अभिनेत्री आणि व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी संध्या शांताराम यांचं निधन झालंय. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्या दिग्ग्ज नृत्यांगणा म्हणून ओळखल्या जायच्या. शिवाय मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी 10.30 वाजता परळ येथील राजकमल स्टूडियो येथून निघेल. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने गुपचूप उरकला साखरपुडा, लग्नाची तारीखही ठरली?

पिंजरा सिनेमात नायिकेची भूमिका साकारली 

मराठी चित्रपटसृष्टीतील एक अमर कलाकृती म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान टिकवून ठेवणारा चित्रपट म्हणजे ‘पिंजरा’. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील एका नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आजही तितक्याच उत्साहाने पाहिला जातो. या सिनेमात संध्या शांताराम यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. व्ही शांताराम यांनी तीन लग्न केली होती. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. 

हेही वाचा : Maharashtra Weather: कोकणातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी

हे वाचलं का?

    follow whatsapp