मुंबईची खबर: आता स्वप्नातील घर BMC मिळवून देणार! मुंबईतील 'या' परिसरात घरांसाठी BMC काढणार म्हाडासारखी लॉटरी...

मुंबई तक

लवकरच, BMC कडून एकूण 184 घरांसाठी लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

आता स्वप्नातील घर BMC मिळवून देणार!
आता स्वप्नातील घर BMC मिळवून देणार!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आता स्वप्नातील घर BMC मिळवून देणार!

point

घरांसाठी BMC काढणार म्हाडासारखी लॉटरी...

point

मुंबईतील 'या' परिसरात मिळतील घरे

Mumbai News: कमाईचे नवे मार्ग शोधण्यासाठी बीएमसीने मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. नवीन डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) नुसार, मोठ्या प्लॉटवर बिल्डर्सकडून मिळणाऱ्या घरांची लॉटरीच्या माध्यमातून विक्री केल्याने बीएमसीची चांगली कमाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे. लवकरच, BMC कडून एकूण 184 घरांसाठी लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घरांची विक्री केल्याने जवळपास 150 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळेल. बीएमसी ही घरे रेडी रेकनर घरांपेक्षा किंचित जास्त किमतीत विकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

जवळपास 110 घरांचं ठिकाण निश्चित

सध्या, बीएमसीला जवळपास 110 घरांचं ठिकाण निश्चित झालं असून बाकी घरांना देखील लवकरच स्थान मिळेल. या नव्या डेव्हलपमेंट प्लॅननुसार, 4000 स्क्वेअर मी पेक्षा मोठ्या भूखंडावर बांधकाम करताना बीएमसीला 20 टक्के घरे अत्यंत कमी आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी बांधणं बंधनकारक आहे.

'या' ठिकाणी मिळतील घरे

बीएमसीला बिल्डर्सकडून कांजुरमार्ग, भायखळा, बोरीवली, अंधेरीच्या परिसरात ही घरे मिळणार आहेत. 2018 मध्ये नव्या डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) ची मंजूरी मिळाल्यानंतर या प्लॉटमध्ये बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालं आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये सर्वांना घर देण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काही महिन्यांतच 300 ते 400 आणखी घरे मिळणार असून ती लॉटरीच्या माध्यमातून मुंबईतील रहिवाशांना देण्यात येणार असल्याचं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा 22 लाख पॅकेज असलेली नोकरी! कसं कराल अप्लाय?

कशी काढली जाणार घरांची लॉटरी? 

बीएमसीने लॉटरीच्या माध्यमातून घरांची विक्री करण्यासाठी म्हाडासारखीच प्रक्रिया अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, BMC म्हाडाप्रमाणे लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन आणि इतर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करणार आहे आणि यानंतर लॉटरी काढली जाईल. या घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडाशी संपर्क साधण्याचा विचार असल्याचा अधिकाऱ्याने सांगितलं. म्हाडाप्रमाणे, ही लॉटरी काढण्यासाठी नवी पद्धत विकसित करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp