Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा 22 लाख पॅकेज असलेली नोकरी! कसं कराल अप्लाय?
CDAC (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) कडून प्रोजेक्ट इंजिनीअर, सीनिअर इंजिनीअर आणि प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ यांसारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा 22 लाख पॅकेजची नोकरी

काय आहे अर्ज करण्याची प्रक्रिया?
Govt Job: कंप्यूटर आणि टेक्नोलॉजी क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. CDAC (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) कडून प्रोजेक्ट इंजिनीअर, सीनिअर इंजिनीअर आणि प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ यांसारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीचं नोटिफिकेशन ऑनलाइन जाहीर करण्यात आली असून 1 ऑक्टोबर 2025 रोजी अर्ज करण्याच्या प्रकियेला सुरूवात झाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार careers.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. विशेष बाब म्हणजे कोणत्याही परीक्षेशिवाय ही भरती केली जाणार आहे.
पद | रिक्त जागा |
प्रोजेक्ट इंजीनियर | 50 |
सीनियर प्रोजेक्ट इंजीनियर/प्रोजेक्ट लीड/मोड्यूल लीड | 25 |
पीएम/प्रोग मैनेजर/Prog Del. मैनेजर/नॉलेज पार्टनर | 05 |
प्रोजेक्ट स्पोर्ट स्टाफ | 23 |
एकूण | 103 |
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह बी.ई/बीटेक किंवा समकक्ष डिग्री असणं अनिवार्य आहे. याला पर्याय म्हणून सायन्स/कम्प्यूटर अॅप्लिकेशन क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री किंवा एम.ई/एमटेक/संबंधित विषयात पीएचडी असणं गरजेचं आहे. तसेच, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफसाठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील. याव्यतिरिक्त पदानुसार, उमेदवारांना 3 ते 15 वर्षांचा अनुभव असणं देखील आवश्यक आहे.
हे ही वाचा: ठाणे: फरार आरोपीने 7 वर्षीय मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य! नंतर, निर्घृण हत्या करून मृतदेह पोत्यात... यापूर्वी सुद्धा असंच...
प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी 0-4 वर्षांचा अनुभव असणारे उमेदवार अप्लाय करू शकतात.
वयोमर्यादा: या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी 30 ते 50 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पगार: संबंधित पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वार्षिक 4.49 लाख ते 22.9 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळेल.
निवड प्रक्रिया: शॉर्टलिस्टिंग/ इंटरव्ह्यू इ. टप्प्यांच्या माध्यमातून उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.