ठाणे: फरार आरोपीने 7 वर्षीय मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य! नंतर, निर्घृण हत्या करून मृतदेह पोत्यात... यापूर्वी सुद्धा असंच...
भिवंडी शहरातील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीने आता सात वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

फरार आरोपीने 7 वर्षीय मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य

निर्घृण हत्या करून मृतदेह पोत्यात भरला अन्...

यापूर्वी सुद्धा केला होता असाच गुन्हा
Crime News: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीने आता सात वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित 33 वर्षीय आरोपी पावरलूम कर्मचारी असून त्याला सहा वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने 1 ऑक्टोबर रोजी अल्वयीन पीडितेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली. नंतर, त्याने मृतदेह पोत्यात भरला आणि तो फरार झाला.
भिवंडी पोलिसांनी दिली माहिती
एका एजन्सीनुसार, संबंधित घटना बुधवारी रात्री घडल्याचं भिवंडी पोलिसांनी सांगितलं. पीडिता घरातून बाहेर पडल्यानंतर ती घरी परतलीच नाही, त्यावेळी कुटुंबियांनी चिंतेत येऊन पीडितेचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही काळानंतर, कुटुंबियांना एका बंद घराबाहेर छोटी बादली दिसली, हीच बादली घेऊन मुलगी तिच्या घरातून बाहेर पडली होती. पीडितेच्या घरच्यांना संशय आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडला आणि आत पोत्यात भरलेला मुलीचा मृतदेह आढळला.
हे ही वाचा: मुंबईतील हनीट्रॅपचं आणखी एक प्रकरण! जळगावच्या व्यावसायिकाला शारीरिक सुखाचं आमिष दाखवून तब्बल 'इतके' रुपये...
यापूर्वी 6 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्याचा आरोप...
या घटनेबद्दल लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. आरोपीने यापूर्वी सुद्धा असा गुन्हा केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. 2023 मध्ये आरोपी तरुणाने एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती आणि या प्रकरणात त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या आरोपाखाली तो ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये होता. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी तरुणाला कोर्टात सादर करण्यासाठी आणण्यात आलं होतं आणि तेव्हा तो पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. आरोपी फरार झाल्यानंतर तो मागील काही दिवसांपासून पुन्हा याच परिसरात दिसला होता.
हे ही वाचा: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा पोलिसांना फोन; रोहित पवार म्हणाले, पुण्यातील गुंड परदेशात...
स्थानिक प्रशासनाचं आश्वासन
ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो त्यावेळी बिहारच्या मधुबनी येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपी भिवंडीच्या बाहेर पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून यासंबंधी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणासंदर्भात स्थानिक लोकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी म्हणून हा खटला फास्ट ट्रॅक प्रक्रियेनुसार न्यायालयात चालवला जाणार असल्याचं स्थानिक प्रशासनाने आश्वासन दिलं आहे.