'माझी पत्नी स्टोव्हवर स्वयंपाक करत होती...', अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; डोळ्यात अश्रू

मुंबई तक

Ramdas Kadam on Anil Parab : 'माझी पत्नी स्टोव्हवर स्वयंपाक करत होती...', अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; डोळ्यात अश्रू

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर

point

अनिल परबांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना रामदास कदम भावूक

Ramdas Kadam on Anil Parab : "रामदास कदमांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं? याची देखील नार्को टेस्ट झाला पाहिजे. खेडमध्ये कोणाला बंगला बांधून दिला? त्याच्यावरुन काय राजकारण झालं? त्यांचा मुलगा आता गृहराज्यमंत्री आहे. गृहखात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. स्वत:च्या बापाने 1993 मध्ये कोणते उद्योग केले? याची चौकशी झाली पाहिजे.", असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. दरम्यान, अनिल परब यांच्या आरोपांना रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय. 

हेही वाचा : बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले; रामदास कदमांचा आरोप, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; काय म्हणाले?

आम्ही आज देखील जीवाभावाने संसार करतो - रामदास कदम 

रामदास कदम म्हणाले, माझी पत्नी स्वयंपाक करत होती. दोन स्टोव्ह होते. ती खेडमध्ये जेवण बनवत होती. पहिल्यांदा साडीला आग लागली. त्यानंतर भडका उडाला. त्यानंतर मी माझ्या पत्नीला वाचवलं. माझे हात जळाले होते. सहा महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती. मी देखील सहा महिने तेथेच उपचार घेत होतो. तू आम्हाला काय सांगतोस रे? आम्ही आज देखील जीवाभावाने संसार करतो. तू अशा प्रकारे बदनामी केलेस तर बदनामीचा दावा टाकेन. मी पहिल्यांदा न्यायालयात जाईन. 

पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, तो बार नव्हता. ऑर्केस्ट्रा होता. एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, त्यावेळेस आम्ही तो बंद केला. पत्नीबाबत माझ्यावर आरोप केले आहेत, त्यामुळे मला वेदना झाल्या आहेत. त्यांनी न्यायलयात जावं त्याचं स्वागत आहे. बाळासाहेबांचा विषय न्यायालयात जावा, असं कालपर्यंत वाटतं नव्हतं. पण तुम्ही असे आरोप केल्यावर मला जावं लागेल. बाळासाहेब होते, तेव्हा मला प्रत्येक दसरा मेळाव्यात बोलू द्यायचं. मात्र, बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळाव्यात मला बोलू दिलं गेलं नाही. हे वास्तव आहे. बाळासाहेब असताना मी कितव्या नंबरला बसत होतो, ते गेल्यानंतर मला कुठं बसावं लागलं? बाळासाहेब गेल्यानंतर लोकं हसतील म्हणून मला नाईलाजाने मंत्रिपद द्यावं लागलं. आत्तापर्यंत पर्यावरण खातं कोणी बघितलं होतं का? 

हे वाचलं का?

    follow whatsapp