बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले; रामदास कदमांचा आरोप, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; काय म्हणाले?

मुंबई तक

Uddhav Thackeray on Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले; रामदास कदमांचा आरोप, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; काय म्हणाले?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले; रामदास कदमांचा आरोप

point

रामदास कदमांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

Uddhav Thackeray on Ramdas Kadam, Pune : " बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death) यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते?" असा सवाल उपस्थित करत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलंय. 

हेही वाचा : रामदास कदमांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं? अनिल परब यांचे सनसनाटी आरोप

उद्धव ठाकरे म्हणाले, मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे. त्याला उत्तर देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे? हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यामुळे त्या गद्दाराला मी काही उत्तर देणार नाही. 

शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात महत्त्वाचे

दरम्यान, कधीकाळी सोबत राहिलेले लोक अशा पद्धतीने आरोप करतात तेव्हा त्रास होतो का? असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, त्रास आणि वेदना होतातच.. पण त्याचवेळेला शिवाजी पार्कमध्ये माझ्या भाषणावेळी पावसात हजारो माणसं भिजत होते. त्यामुळे मी माझं भाषण थांबवू का असं विचारलं त्यावेळी समोरचे लोक म्हणाले, तुम्ही बोला म्हणतात. तेव्हा या वेदनांवर ते रामबाण औषध असतं. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात महत्त्वाचे असतात. ते हात कितीतरी पटींनी माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून तर उभा राहू शकतोय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp