विसर्जनावेळी मोठा अनर्थ! ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली अन् थेट तलावात, 13 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये 10 लहान मुलांचा समावेश
Devi Visarjan : दुर्गामातेच्या विसर्जदनादरम्यान 2 ऑक्टोबर रोजी गुरुवारी मोठा अनर्थ घडला आहे. मध्य प्रदेशात दोन मोठ्या दुर्घटना घडल्या असून या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे, त्यात लहान मुलांचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दुर्गामातेच्या विसर्जदनादरम्यान मोठा अनर्थ

या अपघातात 12 मुलं पाण्यात पडली
Devi Visarjan : दुर्गामातेच्या विसर्जदनादरम्यान 2 ऑक्टोबर रोजी गुरुवारी मोठा अनर्थ घडला आहे. मध्य प्रदेशात दोन मोठ्या दुर्घटना घडल्या असून या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत दहा लहान मुलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. 12 वर्षीय मुलाच्या हातून चुकून इग्निशन चालू झाल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या अपघातात 12 मुलं पाण्यात पडली होती. अशा स्थितीत स्थानिकांना फक्त 11 जणांना बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. बचावलेल्यांपैकी दोन मुलांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाल्याचं समजतंय.
हे ही वाचा : Mumbai Crime : 500 रुपये म्हणत वेश्येनं तरुणाला नेलं लॉजवर, नंतर अश्लील व्हिडिओ बनवत... बाईच्या नादानं सारंच लुबाडलं
बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध
पोलीस आणि एसजीआरएफ पथकांनी बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेण्यास नदीकाठच्या परिसरात शोधमोहिम सुरु केली. तसेच अडकलेले वाहन क्रेनच्या मदतीने काढण्यास यश मिळालं आहे. या घटनेनं सर्वचजण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशीच आणखी एक घटना घडली आहे.
घटनेची पुनरावृत्ती
या दुसऱ्या घटनेत 20 ते 25 जण गावकरी विसर्जनासाठी जमले होते. तेव्हा ट्रॅक्टरची ट्रॉली तलापावत पलटी झाल्याची ही दुसरी दुर्दैवी दुर्घटना होती. यामध्ये आठ मुलींचा मृतांमध्ये समावेश आहे. तर काही जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. पाण्यात अडकलेली ट्रॉली पाण्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्याच्या 'या' तारखेला काही राशींना निर्माण होणार धोका, तयार होतोय एक वाईट योग
ही घटना घडताना उपस्थितांनी माहिती दिली की, ट्रॉली प्रमाणापेक्षा अधिक लोक होते. त्यामुळे ट्रॉली थेट तलावात उलटली. या अशा घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित प्रकरणाची चौकशी केली. ही घटना खंडवा जिल्ह्यातील पंधना तहसीलमध्ये, अर्दला आणि जमली येथे घडली.