Mumbai Crime : 500 रुपये म्हणत वेश्येनं तरुणाला नेलं लॉजवर, नंतर अश्लील व्हिडिओ बनवत... बाईच्या नादानं सारंच लुबाडलं
Mumbai Crime : मुंबईच्या गिरगावात एका वेश्या महिलेनं एका तरुणाला फूस लावली आहे. तरुणाने महिलेवर विश्वास ठेवणं हे त्यांच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसून येतंय. संबंधित वेश्येने तरुणाला एक दोन नाही,तर तब्बल 'एवढ्या' हजार रुपयांना गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईच्या गिरगावात वेश्येनं तरुणाला घातला गंडा

तब्बल 'एवढे' रुपये केले लंपास
Mumbai Crime : मुंबईच्या गिरगावात एका वेश्या महिलेनं एका तरुणाला फूस लावली आहे. तरुणाने महिलेवर विश्वास ठेवणं हे त्यांच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसून येतंय. संबंधित वेश्येने तरुणाला एक दोन नाही,तर तब्बल 35 हजार रुपयांना गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. तरुणी पीडित तरुणाला गोडगुलाबीनं बोलून लॉजवर घेऊन गेली आणि नंतर तरुणाला तिनं ब्लॅकमेल करत 35 हजार रुपयांना गुंडाळलं. ही घटना 23 सप्टेंबर रोजी घडली होती.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्याच्या 'या' तारखेला काही राशींना निर्माण होणार धोका, तयार होतोय एक वाईट योग
नेमकं काय घडलं?
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर तरुणाने व्ही पी रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचे ऐकून पुढील तपास सुरु केला आणि तीन महिलांना या प्रकरणात ताब्यात घेतलं. माजिदा नूर सरकारी गाझी, रुपा विश्वास दास, नसिम्मा जमान शेख असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावं आहेत. संबंधित प्रकरणात ता तिघींनाही न्यायालयात हजर करण्यात आले आहे,
मिळालेल्या एकूण माहितीनुसार, एकूण घडलेल्या घटनेच्या वेळी तक्रारदार तरुण सीएसएमटी रेल्वे स्थानकावर होते. तेव्हा अनोळखी महिलेनं तरुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शरीरसंबंध ठेवण्यासाठी 500 रुपये आकारते असं आमिष दाखवलं, असं तरुणाने संबंधित तक्रारीत म्हटलं आहे. दोघांमध्ये 500 रुपयांचा व्यवहारही झाल्याची माहिती तक्रारदाराने दिली. दोघांमधील व्यवहार ठरला होता, पण हा सौदा तरुणाच्या अंगलट आल्याची माहिती समोर आली आहे.
बदनामीची धमकी
तरुण शरीरसंबंधासाठी तयार झाला असता, त्याला टॅक्सीत बसवून एका हॉटेलमध्ये नेले. त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत तिच्यासोबत इतर काही महिला होत्या. तेव्हा महिलेनं खोलीत प्रवेश करत तक्रारदाराला धमकावले. त्याचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि बदनामीची धमकी दिली होती.