'ज्या तुझ्या बायकोला मी ठेवून घेतली, काय उखाडायचं ते उखाड..' बॉयफ्रेंड महिलेच्या पतीला असं बोलला आणि...

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील बांदामध्ये आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

पत्नीच्या प्रियकराने कॉलवर दिली धमकी! संतापलेल्या पतीने काय केलं?
पत्नीच्या प्रियकराने कॉलवर दिली धमकी! संतापलेल्या पतीने काय केलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीच्या प्रियकराने फोनवर दिली धमकी

point

पत्नीच्या अनैतिक संबंधाला वैतागून पतीची आत्महत्या

Crime News: उत्तर प्रदेशातील बांदामधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. मृतदेहाचं पोस्टमॉर्टम देखील करण्यात आलं असून मृताच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणातील आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून पोलिसांनी तुरुंगात त्यांची रवानगी केली. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं बांदा डीएसपी यांनी सांगितलं. 

काय आहे नेमकं प्रकरण? 

ही घटना कोतवाली शहरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रकरणातील आरोपी पत्नीचं नाव गुडिया आणि तिच्या प्रियकराचं नाव गोपालदास असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना वैतागून आरोपीच्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. आरोपी महिला तिच्या प्रियकरासोबत राहत होती. घटनेपूर्वी आरोपी महिलेच्या पतीने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीला समजून घेण्याऐवजी महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीला मारहाण केल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा: 'हमारी सेना ने तो ठोक दिया...', पहलगाम हल्ल्यावर बोलताना अमित शाह नेमकं काय म्हणाले?

कॉलवर महिलेच्या पतीला दिली धमकी

एके दिवशी आरोपी महिलेच्या प्रियकराने तिच्या पतीला फोन केला आणि "जा, तुझी पत्नी मी ठेवून घेतली. काय करायचं ते कर.." अशी धमकी दिली. पीडित पतीला हीच गोष्ट अजिबात पटली नाही आणि या गोष्टीला वैतागून त्याने आपलं जीवन संपवल्याचा आरोप आहे. मृताच्या मुलीने वडिलांच्या हत्येची तक्रार केली असता पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवलं आहे.

हे ही वाचा: कमाठीपुराची गल्ली नं 12! 400 रुपयांचं डील... पण, केवळ 100 रुपये परत न केल्यास मिळाली 'ती' शिक्षा

या प्रकरणासंदर्भात बांदा डीएसपी पीयूष पांडे माहिती देताना म्हणाले, "एका अल्पवयीन मुलीने कोतवाली नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की तिच्या वडिलांनी तिच्या आई आणि तिच्या प्रियकराच्या अनैतिक संबंधांमुळे आत्महत्या केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर कोतवाली नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp