'माझ्यासोबत शारीरिक संबंध कर..', महिलेनं विवाहित पुरुषाकडे हट्टच धरला, प्रकरण थेट कोर्टात गेलं अन् नंतर..
Woman One Side Love Viral News : एका महिलेनं विवाहित पुरुषाला शारीरिक संबंध करण्यासाठी नाहक त्रास दिला होता. त्या व्यक्तीने महिलेला नकार दिल्यावरही तिने त्याला मानसिक त्रास देणं सोडलंच नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिलेनं विवाहित पुरुषाकडे केली शारीरिक सुखाची मागणी

एकतर्फी प्रेमप्रकरण थेट कोर्टात गेलं

याप्रकरणावर कोर्टाने काय निर्णय दिला?
Woman One Side Love Viral News : एका महिलेनं विवाहित पुरुषाला शारीरिक संबंध करण्यासाठी नाहक त्रास दिला होता. त्या व्यक्तीने महिलेला नकार दिल्यावरही तिने त्याला मानसिक त्रास देणं सोडलंच नाही. याप्रकरणी दिल्ली कोर्टाने महिलेलं चांगलंच सुनावलं होतं. कोर्टाने महिला त्या व्यक्तीच्या घरापासून 300 मीटर हद्दीत न येण्याचा आणि त्याच्या कुटुंबियांना संपर्क न करण्याचा निर्देश दिला होता. तिच्या पतीलाही त्या व्यक्तीजवळ जाण्यापासून रोखलं.
याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर रोहिणी कोर्टाने महिलेला आदेश देत म्हटलं की, याचिकाकर्ता (विवाहित पुरुष) त्यांच्यापासून दूर राहायचं. त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा संपर्क करायचा नाही. याचिकाकर्त्याने कोर्टाला सांगितलं की, 2019 मध्ये एका आश्रमात त्याची महिलेशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. तीन वर्षानंतर महिलेनं त्याला प्रपो केलं. पण आधीच विवाहित असल्याने त्याने महिलेचा प्रस्ताव नाकारला. महिलाही विवाहित होती. पण नकार दिल्यानंतरही महिलेनं मान्य केलं नाही.
हे ही वाचा >> निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी मिळालं प्रमोशन... अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण?
नेमकं काय घडलं होतं?
महिलेनं सोशल मीडियावर तिच्या मुलांना फॉलो करणं सुरु केलं. एवढच नाही, महिलेनं फ्लॅटवर येणं सुरु केलं. शारीरिक संबंध करण्यासाठी तिने त्याच्यावर दबाव टाकला. आत्महत्येची धमकीही दिली. यानंतर याचिकाकर्त्यांनी पोलिसांनाही याप्रकाराबाबत सांगितलं. तरीही महिलेनं ऐकलं नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याला कोर्टाची पायरी चढावी लागली.
याचिकाकर्त्याने घडलेल्या प्रकाराची पुष्टी करण्यासाठी महिलेचं व्हाट्सअॅप चॅट आणि सीसीटीव्ही फुटेज कोर्टात सादर केले. या पुराव्यांच्या आधारावर कोर्टाने म्हटलं की, महिला आणि तिच्या पतीमुळे याचिकाकर्त्याला स्वतंत्रपणे फिरता येत नाही. ते शांततेत जीवन जगू शकत नाही. यामुळेच कोर्टाने हा निर्णय दिला की, महिलेनं याचिकाकर्ता आणि तिच्या कुटुबियांना कोणत्याही प्रकारे संपर्क करू नये. इतकच नाही, तर महिलेनं त्याच्या घरापासून 300 मीटरच्या हद्दीत येऊ नये.