निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी मिळालं प्रमोशन... अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण?

रोहित गोळे

मुंबई पोलीस दलात आपली खास ओळख बनवलेल्या दया नायक यांना त्यांच्या निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी ACP पदावर बढती देण्यात आली आहे. जाणून घ्या नेमके कोण आहेत दया नायक.

ADVERTISEMENT

promoted just 48 hours before retirement who is acp daya nayak the hero who shook the underworld
अंडरवर्ल्ड हादरवणारे ACP दया नायक आहेत तरी कोण? (Photo: X/@DayaBNayak)
google news

मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक (Senior Inspector)  दया नायक (Daya Nayak) यांना निवृत्तीच्या अवघ्या 48 तास आधी गृह विभागाने पदोन्नती दिली आहे. गुन्हेगारी जगात आणि महाराष्ट्र पोलिसात प्रसिद्ध असलेले दया नायक यांना आता ACP (सहाय्यक पोलीस आयुक्त) म्हणून बढती देण्यात आली आहे. मंगळवारी (29 जुलै 2025) बढती मिळालेले दया नायक गुरुवारी (31 जुलै 2025) पोलीस सेवेतून निवृत्त होणार आहेत.

दया नायक यांना गृह विभागाने बढती दिली आहे. दया नायक यांच्याव्यतिरिक्त, मुंबई पोलिसांच्या आणखी तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना असलेल्या जीवन खरात, दीपक दळवी आणि पांडुरंग पवार यांना देखील बढती देण्यात आली आहे.

कोण आहेत दया नायक?

दया नायक 1995 मध्ये मुंबई पोलिसात रुजू झाले होते. ते सध्या गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटमध्ये तैनात आहेत. पण मुंबई पोलिसात त्यांची पहिली पोस्टिंग जुहू पोलीस ठाण्यात होती.

हे ही वाचा>> Mumbai Train Blast Case : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

90 चे दशक, मुंबईत गुन्हेगारांचा सुळसुळाट आणि दया नायक यांची पोलीस दलात एंट्री

90 चं दशक हे वेगवेगळ्या घडामोडींनी ढवळून निघत होतं, विशेषत: आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर. 1993 मध्ये तर मुंबई बॉम्बस्फोटांनी केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण भारत हादरला होता. मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव पोलिसांसाठी एक गंभीर आव्हान बनलं होतं. टोळीयुद्धाच्या घटना सामान्य होत्या. खंडणी, धमक्या आणि खून यामुळे शहरातील वातावरण असुरक्षित झाले होते.

हे वाचलं का?