पत्नी आणि सासूला दगडाने ठेचून... नंतर घरामागे पुरलं अन् त्यावर केळीचं झाड; रचला भयानक कट
ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात बराच काळ बेपत्ता असलेल्या महिला आणि तिच्या मुलीची कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्याच घरामागे आढळले. दोघांचीही निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नी आणि सासूची दगडाने ठेचून हत्या

मृतदेह लपवण्यासाठी खड्ड्यात पुरून त्यावर केळीचं झाड...
Crime News: ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. 19 जुलै पासून बेपत्ता असलेल्या महिला आणि तिच्या मुलीची कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्याच घरामागे आढळले. दोघांचीही निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आल्याचं समोर आलं. 23 वर्षीय सोनाली दलाई आणि तिची 55 वर्षीय आई सुमती दलाई, अशी दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. तसेच, या धक्कादायक प्रकरणातील आरोपी व्यक्तीचं नाव देवाशीष पात्रा असल्याची माहिती समोर आली आहे. देवाशीष सोनालीचा पती म्हणजेच सुमतीचा जावई असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
मृतदेह पुरुन त्यावर लावलं केळीचं झाड
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कुलिआणा ठाणे क्षेत्रातील नुआगांव गावात घडल्याची माहिती मिळाली आहे. 19 जुलै रोजी आरोपी देवाशीषने सोनाली आणि सुमतीला दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. हत्येनंतर त्याने घराच्या मागे खड्डा खणला आणि त्यात दोघींचे मृतदेह पुरले. इतकेच नव्हे, तर पुरलेल्या जमिनीवर केळ्याचं झाड लावून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. कुलिआणा पोलीस स्टेशनमध्ये सोनाली आणि तिच्या आई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, बरेच दिवस बेपत्ता असलेल्या दोघींबद्दल कोणतीच माहिती मिळाली नसल्याने गावकऱ्यांना संशय येऊ लागला.
हे ही वाचा: 'दुसऱ्याच तरुणासोबत...' प्रेयसीचं 'ते' रहस्य कळलं आणि डिप्रेशनमध्ये गेला, नंतर विष प्यायलं अन्...
गावकऱ्यांना आला संशय
त्यानंतर देवाशीषच्या घराच्या मागे असलेल्या बागेतील माती नुकतीच खोदल्याचं गावकऱ्यांना दिसलं. सोनाली आणि तिच्या आईचं बेपत्ता असणं आणि देवाशीषच्या घरामागील बागेची अवस्था, यांचा काहीतरी संबंध असल्याचं गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. यासंबंधीची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीच्या घराची तपासणी केली. घराच्या मागे खोदकाम केल्यानंतर खड्ड्यातून दोन्ही महिलांचे मृतदेह आढळून आले. या डबल मर्डर घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
सोनसोबत आरोपीचं दुसरं लग्न
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी देवाशीषचं हेल्थकेअर वर्कर म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलेसोबत पहिलन लग्न झालं होतं. आरोपी सध्या त्याच्या पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर वादात अडकला असून. त्याने 2 वर्षांपूर्वी सोनालीशी दुसरं लग्न केलं होतं. हे डबल मर्डर प्रकरण बराच काळ चाललेल्या घरगुती तणावामुळे झाल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येमागील खरं कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा: Personal Finance: रियाटरमेंट फंडचा सीक्रेट फॉर्म्युला, प्रत्येक जण विचारेल तुम्ही करोडपती कसे बनला?
पोलिसांचा तपास
प्रकरणासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकरी आणि नातेवाईकांच्या संशयावरुन आरोपी देवाशीषला अटक करण्यात आली. पोलीस चौकशीदरम्यान, आपली पत्नी आणि सासूची हत्या करुन त्यांचा मृतदेह घरामागील बागेत पुरल्याची आरोपीने कबूली दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जेसीबी आणि लोकांच्या मदतीने तिथे खड्डा खणून मृतदेह मृतदेह ताब्यात घेतले. पुढे ते म्हणाले की, "आम्ही आरोपी देवाशिषला ताब्यात घेतलं असून त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतरच आम्हाला हत्येमागील खरे कारण कळू शकेल."