सारखं मोबाईलवर गेम खेळतो म्हणून मोठी बहीण रागावली, नाराज झालेल्या अल्पवयीन भावाने आयुष्य संपवलं!

मुंबई तक

Crime News : सारखं मोबाईलवर गेम खेळतो म्हणून मोठी बहीण रागावली, नाराज झालेल्या अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सारखं मोबाईलवर गेम खेळतो म्हणून मोठी बहीण रागावली

point

नाराज झालेल्या अल्पवयीन मुलाने आयुष्य संपवलं!

Crime News :सध्याच्या युगात अनेकांचा मोबाईल शिवाय दिवस जात नाही. तरुणांना अगदी जेवताना आणि वॉशरुमला गेल्यानंतरही हातात मोबाईल लागतो. मोबाईलचं व्यसन तरुणांमध्ये प्रचंड वाढलेलं पाहायला मिळतं. दरम्यान, आताच्या नव्या पिढीत मोबईलचं व्यसन आणखी वाढताना पाहायला मिळतंय. अनेक लहान मुलांना देखील तासंतास हाती मोबाईल असावा असं वाटू लागलंय. दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका 15 वर्षीय मुलाने आपल्या घरात आत्महत्या केली. कारण इतकेच की त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला मोबाईलवर सारखं गेम खेळतो म्हणून रागावले होते. ही गोष्ट त्या मुलाला इतकी जड गेली की त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. ही घटना गुरुवारी (दि.2) दिल्लीतील आदर्शनगर परिसरात घडली.

मोबाईलवर गेम खेळतो म्हणून बहिणीने रागावलं, लहान भावाने केली आत्महत्या  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल घेऊन सारखं गेम खेळतो म्हणून बहिणीने रागावलं आणि नाराज झालेल्या 15 वर्षीय मुलाने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.  ही घटना उत्तर-पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर परिसरातील आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात या किशोरवयीन मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कार्यवाही केली.  आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या आदर्श नावाच्या मुलाने आपल्या मोठ्या बहिणीसोबत झालेल्या भांडणानंतर घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली, असं चौकशीत निष्पन्न झाल्याचं उत्तर-पश्चिम विभागाचे पोलिस उपायुक्त भीष्म सिंह यांनी सांगितलं.

हेही वाचा : जयंत पाटील भाजपात आले तर त्यांना गोपीचंद पडळकरांच्या मागे बसावे लागेल, चंद्रकांत पाटलांचा टोला

मिळालेल्या माहितीनुसार, हे भांडण तेव्हा झाले जेव्हा त्याच्या बहिणीने त्याला मोबाईल गेम खेळणे आणि अभ्यासात हलगर्जीपणा केल्याबद्दल सुनावले होते. 9 वीत शिकणाऱ्या आदर्शला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत कार्यवाही सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितले की आदर्शचे वडील कुंडली, सोनीपत येथील एका एक्सपोर्ट कंपनीत काम करतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp