'आमचं गुलामीचं गॅजेट, बरं मग इंग्रज काय तुमच्या..', जरांगेंचा पारा चढला, पंकजा मुंडेंना थेट सुनावलं!
Manoj Jarange criticism on Pankaja Munde: दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी भाजप मंत्री पंकजा मुंडेंनी केलेल्या एका विधानावरून जोरदार टीका केली आहे. जाणून घ्या मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

बीड: 'जे गॅजेट लोकशाही प्रस्थापित होण्याआधीचं होतं ते लागू करणं कितपत योग्य?', असं विधान भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. पण त्यांच्या याच विधानावरून मोठी खळबळ माजली आहे. कारण पंकजा मुंडेंच्या या विधानावर मनोज जरांगे यांचा पारा बराच चढला आहे. आज (2 ऑक्टोबर) मराठा समाजाच्या वतीने बीडमधील नारायणगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथेच मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. 'तुम्ही म्हणता आमचं गुलामीचं गॅजेट.. बरं मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का?' असं म्हणत मनोज जरांगेंनी जोरदार टीका केली.
नारायण गडावरून बोलताना मनोज जरांगे संतापले, पाहा काय म्हणालेले
'सगळे बसलेत त्यांचे.. आपल्या घालतात दारात येडे.. पण चूक तुमची आहे. तुमच्या डोक्यातील दया-माया ज्यातच नाही. तुमच्या डोक्यात किडे पडलेत किडे.. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला तर मरेपर्यंत त्याला झटका दाखवायचा. त्याला म्हणायचं जातवान मराठ्यांची अस्सल अवलाद!'
'त्याला वाटतं की, संग तर हिंडतय हे #%$&@ पण इतके माझ्या जवळचे लोकं फोडून याने मला पाडलं कसं काय? तुम्हाला कडवट बनावं लागेल.'
हे ही वाचा>> कुणबी दाखले दिलेल्यांची संख्या मोजा, वेगळा प्रवर्ग करा; गोपीचंद पडळकर काय काय म्हणाले?
'एक उदाहरण सांगतोय.. हे काय करतात की, निवडणुकीच्या आधी आपल्याला थोडं डिवचतात आणि मग मी तिकडून उत्तर देतो. मी उत्तर दिलं की, 3 ते 4 महिने गप्प बसतात. त्याचा अर्थ समजून घ्या. ढिले नका म्हणू त्याला..'