भाजप सोडून कोणात्याही पक्षाशी युती करा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकांसाठी प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांना भाजप सोडून कोणात्याही पक्षाशी युती करण्याची मुभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकांसाठी आंबेडकरांचा मोठा निर्णय
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाजप सोडून कोणात्याही पक्षाशी युती करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकांसाठी आंबेडकरांचा मोठा निर्णय
Akola : "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणाचीही स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली आहे. महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करण्यातही आपली कोणतीही हरकत नाही", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा : कुणबी दाखले दिलेल्यांची संख्या मोजा, वेगळा प्रवर्ग करा; गोपीचंद पडळकर काय काय म्हणाले?
"कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असताना काय केलं?"
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावतात?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाय. ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाय योजनांना परवानगी देऊ शकत नाही. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, असा नियम सांगतो. सरकारचे सर्वेक्षण आणि इतर कोणत्याच गोष्टी झालेल्या नसतांना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. आता कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असताना काय केलं?, असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं.
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारची आणखी एक मोठी अट, सविस्तर माहिती एका क्लिकवर